Shreyas Iyer: 'आशा आहे निवडकर्ते अय्यरच्या फलंदाजीला आता कमी महत्त्व देतील...' माजी क्रिकेटरने सुनावले खडेबोल

India vs England, Test Cricket: इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यासाठी श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही, याबद्दल ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Shreyas Iyer
Shreyas Iyer Dainik Gomantak
Published on
Updated on

Ian Chappell shared his views on Shreyas Iyer not selected for remainder of India vs England Test series:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना राजकोटला 15 फेब्रुवारीपासू खेळवला जाणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील उर्वरित ती सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

या संघात श्रेयस अय्यरला संधी दिलेली नाही. त्याला दुखापत असल्याची चर्चा होती. मात्र त्याच्या संघातील अनुपस्थितीबाबत मात्र बीसीसीआयने कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे त्याला वगळल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तसेच दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्याला मुकलेल्या रविंद्र जडेजा आणि केएल राहुल यांचीही संघात निवड झाली आहे. पण त्यांचा सहभाग त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. त्याचबरोबर विराट कोहलीनेही त्याच्या सुटीचा कालावधी वाढवला असल्याने तोही या मालिकेचा भाग नसणार आहे.

Shreyas Iyer
U19 World Cup: 'इट्स नॉट फनी!', फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाने पुन्हा चीतपट केल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

याबद्दल इएसपीएन क्रिकइन्फोसाठी लिहिलेल्या स्तंभलेखात ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी त्यांची मते मांडली आहेत. यात त्यांनी श्रेयस अय्यरच्या फलंदाजी क्षमतेवर अतिआत्मविश्वास दाखवू नये असे निवडकर्त्यांना सुचवले आहे. तसेच कुलदीप यादवच्या गोलंदाजीचे कौतुकही केले आहे.

त्यांनी लिहिले की 'भारत एक मजबूत संघ आहे. त्यांच्याकडे रोहित शर्मासारखा चांगला कर्णधारही आहे. तसेच रविंद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतीतून सावरल्याने त्यांच्या संघाला मजबूती मिळाली आहे, पण विराट कोहलीची अनुपस्थिती नक्कीच मोठा धक्का असेल.'

'तसेच आशा आहे की निवडकर्ते आता श्रेयस अय्यरच्या फलंदाजी श्रमतेबद्दल अधिक आशावादी नसतील आणि कुलदीप यादवच्या विकेट घेण्याच्या क्षमतेला महत्त्व देणे शिकतील.'

Shreyas Iyer
Shreyas Iyer Catch: भारीच! मागे पळत येत सूर मारून अय्यरने भन्नाट कॅच, इंग्लंडच्या क्रावलीला 76 धावांवर धाडलं माघारी

दरम्यान, श्रेयस अय्यरची गेल्या काही महिन्यात फारशी चांगली फलंदाजी कसोटी क्रिकेटमध्ये झालेली नाही. त्याला त्याच्या गेल्या 13 कसोटी डावात 50 धावांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या चालू असलेल्या मालिकेतही पहिल्या सामन्यात त्याने 35 आणि 13 धावा केल्या. तसेच दुसऱ्या सामन्यातही 27 आणि 29 धावांची खेळी केली होती.

त्याचबरोबर चॅपेल यांनी लिहिले की 'घरच्या मैदानात भारताने अखेर मालिका जिंकायला तर हवी, पण याची जबाबदारी त्यांच्याच हातात असणार आहे. जो रुटच्या खराब नेतृत्वातील संघापेक्षा, जो संघ शेवटच्या भारतीय दौऱ्यात फिरकी गोलंदाजीपुढे ढेपाळला होता, त्यापेक्षा स्टोक्सचे आक्रमक नेतृत्वातील संघ फार चांगला आहे.'

दरम्यान, राजकोट कसोटीनंतर 23 फेब्रुवारीपासून भारत-इंग्लंड संघात रांचीमध्ये चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर 7 मार्चपासून धरमशाला येथे पाचवा कसोटी सामना खेळला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com