'RCB जोपर्यंत IPL जिंकत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही' महिला क्रिकेटप्रेमीचा फोटो व्हायरल

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान एका चाहत्याने अतिशय अनोख्या पद्धतीने संघाविषयीची उत्कटता व्यक्त केली.
RCB Female Fan
RCB Female Fantwitter/@MishiAmit
Published on
Updated on

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आतापर्यंत आयपीएलचे (IPL 2022) जेतेपद पटकावलेले नाही. संघासोबतच चाहतेही विजयाची वाट पाहत आहेत. आता ही प्रतीक्षा कधी संपणार? हे तर वेळच सांगेल. पण दोन दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात एका चाहत्याने अतिशय अनोख्या पद्धतीने संघाविषयीची उत्कटता व्यक्त केली.

या सामन्यात एक महिला क्रिकेटप्रेमी (Cricket) खास पोस्टर घेऊन पोहोचली होती, ज्यावर लिहिले होते- RCB जोपर्यंत IPL चे विजेतेपद जिंकत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. या पोस्टर गर्लचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय फिरकीपटू अमित मिश्रानेही या आरसीबी फॅन मुलीचा फोटो शेअर करत तिच्या लग्नाबाबत चिंता व्यक्त केली आहे. अमितने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. 'खरंच आता मला तिच्या आई-वडिलांची चिंता आहे.'

RCB Female Fan
IPL 2022: रवींद्र जडेजा पुन्हा बनला RCB चा 'काळ', 3 विकेट्स घेत बनवला नवा रेकॉर्ड

महिलेने घेतली अनोखी शपथ

दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. सामन्यादरम्यान जेव्हा कॅमेरा आरसीबीच्या या महिला फॅनवर केंद्रित झाला तेव्हा काही काळ सर्वांच्या नजरा या महिलेवर खिळल्या. याचं कारण होतं तिच्या हातातलं पोस्टर, ज्यावर लिहिलं होतं- RCB जोपर्यंत IPL ट्रॉफी जिंकत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. यावर इतर चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

आरसीबीने या मोसमात 5 पैकी 3 सामने जिंकले

आता या महिलेचे स्वप्न कधी पूर्ण होईल हे कोणालाच माहीत नाही. या मोसमातही आरसीबीची कामगिरी आतापर्यंत संमिश्र आहे. या संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले असून सध्या गुणतालिकेत RCB सहाव्या स्थानावर आहे. आरसीबीसाठी चांगली गोष्ट म्हणजे विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल धावा करत आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीही चांगले खेळत आहे. मात्र, जेतेपदासाठी आरसीबीला यापेक्षा चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

RCB Female Fan
'आमची खेळी चांगली नाही, तयारीची गरज': रोहित शर्मा

आरसीबी तीन वेळा उपविजेता ठरला आहे

आरसीबीने आतापर्यंत तीन वेळा आयपीएल फायनल खेळली आहे. मात्र तिन्ही वेळा संघाचे विजेतेपद हुकले. पहिल्यांदा, RCB संघ 2009 मध्ये, नंतर 2011 मध्ये आणि पुन्हा 2016 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. गेल्या मोसमातही आरसीबीने जेतेपदापर्यंत मजल मारली होती. पण जिंकता आले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com