World Cup 2023: वर्ल्डकपच्या वेळपत्रकाचा घोळ, फॅन्सही तापले; आता BCCI उपाध्यक्ष म्हणाले...

World Cup 2023: हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने वर्ल्डकप सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्याची विनंती केली होती, त्यावर आता बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनीच स्पष्ट उत्तर दिले आहे.
World Cup 2023
World Cup 2023Dainik Gomantak

BCCI vice-president Rajeev Shukla statement after Hyderabad cricket association requested schedule change in World Cup matches:

भारतात 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळली जाणार आहे. पण ही स्पर्धा होण्यापूर्वीच अनेक गोंधळ समोर येत आहते. स्पर्धेला दोन महिन्यांहून कमी कालावधी राहिलेला असतानाही अद्याप तिकिट विक्रीही सुरू झालेली नाही.

त्यातच वेळापत्रकामधील काही सामन्यांमध्ये बदल झाले आहेत. तर आता असेही समोर येत आहे की हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने सलग दोन दिवसात दोन सामने आयोजित करणे सुरक्षेच्या कारणाने कठीण असल्याचे बीसीसीआयला कळवले आहे.

दरम्यान, ऑगस्टच्या सुरुवातीला बीसीसीआय आणि आयसीसीने बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीनंतर 9 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला होता. त्यांनी नवरात्री आणि दिवाळीच्या सणांमुळे सुरक्षेची समस्या असल्याचे सांगितले होते.

World Cup 2023
World Cup 2023: शिक्कामोर्तब झालं! भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, ICC ची घोषणा

आता पुन्हा हैदराबादनेही सामन्यांची तारिख बदलण्याची विनंती केली असल्याने चाहत्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. आधीच तिकिट विक्री उशीराने सुरु होत असल्याने हॉटेल्स, विमान तिकिटे बुक करताना चाहत्यांना समस्या उद्भवत आहेत. तिकिट विक्री 25 ऑगस्टनंतर टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.

बऱ्याचदा आयसीसी स्पर्धांसाठी जवळपास वर्षभर आधीच तिकिटांचा आणि वेळापत्रकाचा तपशील जाहीर केला जातो. मात्र, वर्ल्डकप 2023 स्पर्धेबाबत या सर्वच गोष्टींनी आधीच उशीर झाला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे.

दरम्यान, हैदराबादने विनंती केली असली तरी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आता बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे.

World Cup 2023
ICC World Cup 2023 Tickets: 'या' दिवसापासून मिळणार वर्ल्डकपची तिकिटं; भारत-पाक सामन्यासाठी कधीपासून होणार बुकींग?

बीसीसीआयने ज्या सामन्यांच्या तारखांमध्ये यापूर्वी बदल केला होता, त्यात भारत आणि पाकिस्तान सामन्याचाही समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरऐवजी 14 ऑक्टोबरला अहमदाबादला खेळवण्यात येणार आहे. 

या सामन्याची तारिख बदलल्यामुळे तसेच पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना 12 ऑक्टोबर ऐवजी 10 ऑक्टोबर रोजी हैदराबादला खेळला जाणार आहे. दरम्यान हैदराबादला 9 ऑक्टोबरला देखील न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे सलग दोन दिवस सामने असल्याने पोलिसांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे की 'मी वर्ल्डकपसाठी हैदराबादमध्ये प्रभारी असणार आहे. काही समस्या किंवा काही अडचण असेल तर ते सोडवण्याचा प्रयत्न करू. वर्ल्डकपचे वेळापत्रक बदलणे सोपे नाही आणि तसे होण्याची शक्यताही नाही. फक्त बीसीसीआय वेळापत्रक बदलू शकत नाही. यात अन्य संघ आणि आयसीसीचाही सहभाग असतो.'

वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान 10 शहरांमध्ये खेळवली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com