अपराजित संघांत चढाओढ, केरळा ब्लास्टर्सला हैदराबादचे आव्हान

केरळा ब्लास्टर्सने 3 विजय व 5 बरोबरी अशी अपराजित कामगिरी साधली आहे.
ISL Football
ISL FootballDainik gomantak
Published on
Updated on

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात केरळा ब्लास्टर्स व हैदराबाद एफसी सलग आठ सामने अपराजित आहेत, त्यांच्यात रविवारी (ता. 9) होणारी लढत तुल्यबळ असेल आणि गुणतक्त्यातही महत्त्वपूर्ण असेल.

हैदराबादने विजय नोंदविल्यास त्यांना पहिल्या टप्प्याअखेरीस अव्वल स्थानावर हक्क सांगता येईल. पहिल्या चार संघांत राहण्यासाठी केरळा ब्लास्टर्सलाही विजय अत्यावश्यक आहे. प्रत्येकी 9 सामने खेळल्यानंतर हैदराबादचे 16, तर केरळा ब्लास्टर्सचे 14 गुण आहेत.

दोन्ही संघांत समानता आहे. आठव्या मोसमात त्यांना पहिलाच सामना गमवावा लागला. त्यानंतर हैदराबादने एकही हार न स्वीकारता 4 सामने जिंकले, 4 लढती बरोबरीत राखल्या. केरळा ब्लास्टर्सने ओळीने 3 विजय व 5 बरोबरी अशी अपराजित कामगिरी साधली आहे.

ISL Football
IND vs SA: ‘भारत को मेरी हड्डियां तोड़नी होंगी’, डीनच्या वचनाचा वडिलांकडून खुलासा

ओगबेचेचा फॉर्म निर्णायक

हैदराबादचा (Hyderabad) नायजेरियन आघाडीपटू बार्थोलोम्यू ओगबेचे जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 9 सामन्यांत 9 गोल करून गोल्डन बूटसाठी अव्वल स्थान मिळवले आहे. केरळा ब्लास्टर्सला ओगबेचे याच्या धडाक्याचा जास्त धोका असेल. 9 सामन्यांत 20 गोल केलेल्या हैदराबादचे आक्रमण धारदार आहे. त्यामुळे केरळा ब्लास्टर्सच्या बचावावर ताण येऊ शकतो. त्यांना मागील लढतीत एफसी गोवाविरुद्ध दोन गोलची आघाडी घेऊनही बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. ``केरळा (Kerala) ब्लास्टर्सच्या बचावफळीतील तीन परदेशी फुटबॉलपटूंसह (Football) भारताचे खेळाडू धोकादायक आहेत. दोन्ही संघ फॉर्मात असल्याने रविवारचा सामना उभय संघांसाठी सोपा नसेल,`` असे हैदराबादचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी नमूद केले.

ISL Football
LLC: सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी

केरळा ब्लास्टर्ससाठी लुना महत्त्वाचा

अड्रियन लुना याचा सर्वोत्कृष्ट खेळ हे केरळा ब्लास्टर्सच्या सातत्याचे प्रमुख कारण आहे. एफसी गोवाविरुद्ध त्याने मोलाचा वाटा उचलला. एक गोल करतानाच दुसरा गोल करण्यास सहकार्य केले. हैदराबादसारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लुना हा सर्वोत्तम खेळ करेल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक इवान व्हुकोमानोविच यांनी व्यक्त केला. ``मागील आठ सामन्यांत आमचा खेळ चांगला झाला तरी उर्वरित प्रत्येक सामन्यात आणखी चांगली कामगिरी करण्याला आमचे प्राधान्य असेल,`` असे व्हुकोमानोविच म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com