Indian Women Cricket: पुण्याचा स्टार क्रिकेटर बनला महिला संघाचा प्रशिक्षक! BCCIचा मोठा निर्णय

बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघासाठी नवीन फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.
India Women Cricket Team
India Women Cricket TeamDainik Gomantak

Indian Women Cricket: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला क्रिकेट संघाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू हृषिकेश कानिटकर यांना वरिष्ठ भारतीय महिला संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे.

त्यामुळे ते 9 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेपासून संघाशी जोडले जातील.

India Women Cricket Team
Indian Women's Team: कांगारुंना आस्मान दाखवण्यासाठी इंडियन वुमन्स टीम सज्ज, पाहा संपूर्ण संघ

दरम्यान भारतीय महिला संघाचे (Indian Women Cricket Team) माजी प्रशिक्षक रमेश पोवार यांना बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता ते एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या टीममध्ये सहभागी होतील आणि भारतीय पुरुष क्रिकेटसाठी काम करतील.

India Women Cricket Team
U19 Women's T20 WC 2023 साठी टीम इंडियाची घोषणा, शफाली वर्माकडे कर्णधारपद

भारतीय महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल पुण्यातील जन्म असणारे हृषिकेश कानिटकर (Hrishikesh Kanitkar) म्हणाले, 'वरिष्ठ महिला संघाचा नवीन फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिमान वाटत आहे. या संघात खूप गोष्टींबाबत संभावना आहेत आणि संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे.'

'मला खात्री आहे हा संघ पुढील आव्हानांसाठी सज्ज आहे. आमच्यासमोर काही महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. संघ आणि मी येणाऱ्या स्पर्धांसाठी उत्सुक आहोत.'

भारतीय महिला संघ 9 ते 20 डिसेंबरदरम्यान ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध मुंबईत 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com