टीम इंडियाचा (Team India) स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. बीसीसीआयकडून (BCCI) त्याला वर्षाला 7 कोटी रुपये पगार दिला जातो कारण तो ए प्लस ग्रेडच्या यादीत येतो.
विराट कोहलीची एकूण संपत्ती किती आहे?
विराट कोहली त्याच्या कमाईसाठी केवळ बीसीसीआयच्या पगारावर अवलंबून नाही, तर तो इतर अनेक स्रोतांमधून पैसे कमावतो. 'किंग कोहली'सारख्या अनेक ब्रँडच्या जाहिरातीतून करोडो रुपये विराटला मिळतात. डीएनए वेबसाइटनुसार, त्याची एकूण संपत्ती सुमारे 60 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे.
इंस्टाग्रामच्या माध्यमातून करोडोंची कमाई
विराट कोहलीच्या कमाईचा आणखी एक स्त्रोत म्हणजे इन्स्टाग्राम (Instagram). या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे 177 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. टीम इंडियाच्या टेस्ट कॅप्टनला एका प्रमोशनल पोस्टसाठी 5 कोटी रुपये मिळतात. विराट कोहली व्यतिरिक्त, बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही एकमेव भारतीय सेलिब्रिटी आहे जिचा इंस्टाग्रामवरील टॉप श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तीचे 72.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. प्रियांकाला एका प्रमोशनल पोस्टसाठी 3 कोटी रुपये मिळतात.
रोनाल्डोची कमाई
इंस्टाग्रामवरील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी म्हणजे पोर्तुगालचा फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो आहे ज्याचे इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर 387 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. प्रमोशनल पोस्टसाठी तो 1,604,000 अमेरिकन डॉलर्स कमावतो. याच यादीत माजी प्रोफेशल कुस्तीपटू ड्वेन 'द रॉक' जॉन्सन आणि गायिका-अभिनेत्री एरियाना ग्रांडे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.