Asian Games 2023: चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई गेम्स 2023 साठी भारत आणि पाकिस्तानच्या पुरुष हॉकी संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे, जिथे हे दोन्ही संघ 30 सप्टेंबर रोजी आमनेसामने येतील.
जपान, बांगलादेश, सिंगापूर आणि उझबेकिस्तानसह भारत आणि पाकिस्तान अ गटात आहेत. भारताचा पहिला सामना 24 सप्टेंबर रोजी उझबेकिस्तानविरुद्ध होणार आहे.
दरम्यान, भारतीय महिला हॉकी संघालाही अ गटात स्थान देण्यात आले असून तिथे त्यांचा सामना हाँगकाँग, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि मलेशियाशी होणार आहे.
भारतीय संघ 27 सप्टेंबर रोजी सिंगापूरविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. पुरुषांच्या ब गटात दक्षिण कोरिया, मलेशिया, चीन, ओमान, थायलंड आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे तर महिला गटात जपान (Japan), चीन, थायलंड, कझाकिस्तान आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे.
उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्याने मोहिमेची सुरुवात केल्यानंतर, भारतीय पुरुष संघ 26 सप्टेंबर रोजी सिंगापूर आणि 28 सप्टेंबर रोजी जपानशी भिडेल.
त्यानंतर त्यांचा सामना 30 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होईल, तर साखळी टप्प्यातील त्यांचा शेवटचा सामना 2 ऑक्टोबर रोजी बांगलादेशशी होईल. पुरुष विभागाचा अंतिम सामना 6 ऑक्टोबर रोजी तर महिला विभागाचा अंतिम सामना त्यानंतर खेळवला जाईल.
दुसरीकडे, भारत (India) आणि पाकिस्तानचा संघ सध्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत आहे. भारतीय संघाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीच पक्के केले आहे, परंतु राऊंड-रॉबिन लीगच्या अंतिम सामन्यात बुधवारी त्याचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
आतापर्यंतच्या स्पर्धेत दोन्ही संघांच्या कामगिरीचा विचार केला तर भारत त्यांच्या चार सामन्यांत अपराजित आहे, तर पाकिस्तानला केवळ एक विजय नोंदवता आला आहे.
त्याने दोन सामने अनिर्णित ठेवले तर एका सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. या महत्त्वाच्या सामन्याच्या निकालावर तो उपांत्य फेरी गाठणार की नाही हे ठरणार आहे.
जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर तो अंतिम चारमध्ये पोहोचेल, पण जर तो हरला तर त्याला चीन आणि जपान यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. पाकिस्तानचा पराभव झाला तर चीनच्या जपानवरील विजयासाठी प्रार्थना करावी लागेल. मात्र, जपान जिंकला तर विजयाचे अंतर कमी असावे.
याशिवाय, मलेशियन संघाने दक्षिण कोरियावर मोठ्या फरकाने विजय मिळवावा, अशी पाकिस्तानची इच्छा आहे.
भारत तीन विजय आणि एक अनिर्णित 10 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर मलेशिया (9 गुण), दक्षिण कोरिया (5), पाकिस्तान (5), जपान (2) आणि चीन (1) यांचा क्रमांक लागतो.
भारत आणि पाकिस्तानने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, पण सध्याचे रँकिंग आणि फॉर्म पाहता भारत बुधवारी विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करेल.
जागतिक रँकिंग भारत क्रमांक 4 वर तर पाकिस्तान 16 व्या क्रमांकावर आहे. पण स्पर्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाल्यास रँकिंगमध्ये फारसा फरक पडणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.