Hockey World Cup नंतर भारत 'या' स्पर्धेसाठी सज्ज, युवा खेळाडूंना मिळाली संधी

FIH Hockey Pro League: हॉकी विश्वचषकात टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघ प्रो लीगसाठी सज्ज झाला आहे.
India (Hockey World Cup)
India (Hockey World Cup)Dainik Gomantak

FIH Hockey Pro League: हॉकी विश्वचषकात टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघ प्रो लीगसाठी सज्ज झाला आहे. भारताला या स्पर्धेतील पहिला सामना जर्मनीविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना 10 मार्च रोजी होणार आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत हरमनप्रीत सिंग टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.

तर मिडफिल्डर हार्दिक सिंगला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. विश्वचषकातील पराभवानंतर भारताला या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची मोठी संधी आहे.

या खेळाडूंना संधी मिळाली

या संघात अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि युवा खेळाडू पवन यांचा समावेश आहे, जो कृष्ण बहादूर पाठकच्या जागी आला आहे. पाठक त्याच्या लग्नामुळे संघाबाहेर राहणार आहे. हरमनप्रीतसोबत जुगराज सिंग, नीलम संजीप जेस, जर्मनप्रीत सिंग, सुमित, मनजीत आणि मनप्रीत सिंग बचावाची धुरा सांभाळतील.

तर हार्दिक, विवेक सागर प्रसाद, मोइरंगथम रबिचंद्र सिंग, विष्णुकांत सिंग, दिलप्रीत सिंग, शमशेर सिंग आणि राज कुमार पाल बचावाची जबाबदारी सांभाळतील. एस कार्ती, सुखजीत सिंग, अभिषेक आणि गुरजंत हे युवा खेळाडू फॉरवर्ड लाईनवर असतील.

India (Hockey World Cup)
Hockey World Cup नंतर भारतीय टीमच्या प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' सदस्यांनीही सोडली साथ

टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळाला

हॉकी वर्ल्डकपमधील पराभवानंतर भारताच्या ग्रॅहम रीड यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. शिवेंद्र सिंग यांच्यासोबत आगामी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड जॉन आणि बीजे करिअप्पा यांची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय संघात निवड न झालेल्या खेळाडूंना रविवारपासून बंगळुरू येथे सुरु झालेल्या तिसऱ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद 2023 मध्ये खेळण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरातून सूट देण्यात आली आहे.

राष्ट्रीय निवडकर्त्यांनी या स्पर्धेसाठी युवा खेळाडूंना अधिक एक्सपोजर दिले आहे. हे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत. या संघात अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडूंना खूप काही शिकण्याची संधी मिळणार आहे.

तसेच, हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी येथे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “संघ राउरकेला येथे FIH हॉकी प्रो लीगमध्ये अंतरिम प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली खेळेल. हॉकी (Hockey) इंडियाकडून नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा होईपर्यंत हा संघ अंतरिम प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली खेळणार आहे.''

India (Hockey World Cup)
Hockey World Cup 2023: जर्मनी तिसऱ्यांदा जगज्जेता! गतविजेत्या बेल्जियमचा फायनलमध्ये पराभव

प्रो लीगसाठी भारताचे वेळापत्रक

  • भारत (India) विरुद्ध जर्मनी - 10 मार्च 2023

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 12 मार्च 2023

  • भारत विरुद्ध जर्मनी - 13 मार्च 2023

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 15 मार्च 2023

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com