Herschelle Gibbs: जेव्हा 6 चेंडूत 6 सिक्स मारणाऱ्या गिब्सने दारुच्या नशेत ठोकलेल्या 175 धावा, वाचा त्या खेळीबद्दल

Herschelle Gibbs 175 Runs Inning: हर्षेल गिब्सने कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. यातील त्याने केलेली 175 धावांची खेळी चक्क दारुच्या नशेत केली होती, या खेळीबद्दल जाणून घ्या.
Herschelle Gibbs
Herschelle GibbsDainik Gomantak
Published on
Updated on

Herschelle Gibbs: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू हर्षेल गिब्सने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेकदा अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. त्याने 361 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 37.30 च्या सरासरीने 14661 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 35 शतकांचा आणि 66 अर्धशतकांचा समावेश आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गिब्सने त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च 175 धावांची खेळी चक्क दारूच्या नशेत केली होती. याबद्दल स्वत: गिब्सने माहिती दिली होती. तारिख होती 12 मार्च 2006, या दिवशी वनडे क्रिकेटच्या इतिहासातील एक ऐतिहासिक सामना पार पडला होता. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जोहान्सबर्ग येथे झाला होता.

या सामन्यात तब्बल 872 धावा दोन्ही संघांनी मिळून काढल्या होत्या. यामध्ये गिब्सच्या ऐतिहासिक 175 धावांच्या खेळीचा समावेश आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 4 बाद 434 धावा उभारल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार रिकी पाँटिंगने 105 चेंडूत 164 धावांची खेळी केली होती.

Herschelle Gibbs
IND vs AUS: केएल राहुल इंदूर कसोटीत खेळणार नाही? कर्णधार रोहित शर्मा देणार मोठा धक्का!

त्यानंतर तब्बल 435 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर होते. पण दक्षिण आफ्रिकेनेही हे आव्हान पेलले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने पहिली विकेट दुसऱ्याच षटकात गमावलेली. पण त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हर्षल गिब्सने मैफल लुटली.

त्याने आक्रमक फलंदाजी करताना 111 चेंडूत 21 चौकार आणि 7 षटकारांसह 175 धावांची खेळी केली आणि दक्षिण आफ्रिकेसाठी विजयाचा मार्ग सोपा केला.

दरम्यान, या सामन्यापूर्वी गिब्सने जोरदार पार्टी केली होती. त्याने सामन्याच्या आदल्या रात्री भरपूर दारू प्यायली होती. त्यामुळे सामन्यादरम्यान, त्याचा हँगओव्हर पूर्ण उतरलाही नव्हता. यादबद्दल त्याने त्याच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की तो या सामन्याच्या आदल्या रात्री 1 वाजेपर्यंत मित्रांबरोबर दारू पित होता.

त्यामुळे जेव्हा तो फलंदाजीला आला, तेव्हाही त्याचा हँगओव्हर उतरलेला नव्हता. पण त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर झाला नाही आणि त्याने वनडे इतिहासात 400 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारा पहिला संघ होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला मदत केली.

Herschelle Gibbs
IND vs AUS: ऑस्ट्रेलियन टीमची वनडे सिरीजसाठी घोषणा! भारताविरुद्ध तीन घातक खेळाडूंचे होणार कमबॅक

गिब्सवर नशा करण्यामुळे झालेली कारवाई

गिब्स एकदा अंमली पदार्थांची नशा करतानाही आढळला होता. जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ 2001 साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता, तेव्हा 11 मेच्या रात्री गिब्स जस्टिन कॅम्प, आंद्रे नील आणि पॉल ऍडम्स या संघसहकाऱ्यांसह अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळला होता.

त्यामुळे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने या खेळाडूंवर कारवाई करताना 10 हजार दक्षिण आफ्रिकन रेंडचा दंड ठोठावला होता. गिब्सवर कारवाई होण्याची ही पहिली वेळ नव्हती, यापूर्वी 2000 साली त्याला फिक्सिंगच्या कारणानेही 6 महिने बंदीचा सामना करावा लागला होता.

वनडेत 6 चेंडूत 6 षटकारांचा पराक्रम

गिब्सची कारकिर्द वादग्रस्त राहिली असली, तरी त्याने त्याच्या कारकिर्दीत काही अविस्मरणीय कामगिरी केली आहे. त्यातीलच एक म्हणजे 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा.

गिब्सने 16 मार्च 2007 रोजी वनडे वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध खेळताना 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते. त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडूत सलग 6 षटकार मारणाला पहिला खेळाडूही ठरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com