Medical emergencyमुळे इंग्लंडमध्ये चालू सामन्यात मैदानातच उतरविले हेलिकॉप्टर

ग्लॉस्टरशायर (Gloucestershire) आणि डरहम (Durham) यांच्यातील सामन्याच्या पहिल्या षटकात ही घटना घडली. त्यानंतर काउंटी चॅम्पियनशिप (County Championship) सामना बराच काळ रोखण्यात आला.
वैद्यकीय आणीबाणीमुळे (Medical emergency) हेलिकॉप्टर (Helicopter) चालू सामन्याच्या मैदानातच मध्यभागी उतरविण्यात आले.
वैद्यकीय आणीबाणीमुळे (Medical emergency) हेलिकॉप्टर (Helicopter) चालू सामन्याच्या मैदानातच मध्यभागी उतरविण्यात आले.Dainik Gomantak
Published on
Updated on

आपण बऱ्याच वेळा खेळाच्या मैदानावर (On the playground) पाहिले की काही कारणांमुळे सामना थांबला आहे. कधीकधी चाहते हे त्यामागील कारण असतात तर कधी इतर कारणे देखील त्याला जबाबदार असतात. अशीच एक घटना मंगळवारी इंग्लंडमधील (England) ब्रिस्टल क्रिकेट मैदानावर ग्लॉस्टरशायर (Gloucestershire) आणि डरहम (Durham) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान घडली. वैद्यकीय आणीबाणीमुळे (Medical emergency) हेलिकॉप्टर (Helicopter) चालू सामन्याच्या मैदानातच मध्यभागी उतरविण्यात आले.

वैद्यकीय आणीबाणीमुळे (Medical emergency) हेलिकॉप्टर (Helicopter) चालू सामन्याच्या मैदानातच मध्यभागी उतरविण्यात आले.
ENG vs IND: पाचव्या कसोटी सामन्यासाठी जार्वोचा नवा प्लान तयार

ग्लॉस्टरशायर आणि डरहम यांच्यातील सामन्याच्या पहिल्या षटकात ही घटना घडली. त्यानंतर काउंटी चॅम्पियनशिप सामना बराच काळ रोखण्यात आला. खरे तर, स्टेडियमजवळील एका रुग्णाला वैद्यकीय उपचारांची गरज होती आणि यामुळे एअर अॅम्ब्युलन्स मैदानावर उतरली. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरल्यावर खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये जाण्यास सांगितले गेले.

ग्रेट वेस्टर्न एअर अॅम्ब्युलन्स (GWAAC) ने सांगितले की रुग्णाला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे GWAACच्या प्रवक्त्याने सांगितले. “ब्रिजवॉटर येथे एका रुग्णावर उपचार केल्यानंतर टीम त्यांच्या विमानतळाकडे परत जात होती. एक क्रिटिकल केअर डॉक्टर आणि दोन तज्ञ पॅरामेडिक्स बोर्डवर होते. ब्रिस्टल काउंटीमध्ये रुग्णाला शक्य तितक्या लवकर उपचार मिळावेत. हवाई रुग्णवाहिका चालू सामन्यात थेट मैदानावर उतरवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com