Heath Davis: न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटूने केला समलैंगिक असल्याच खुलासा

क्रिकेट जगतातील अनेक महिला खेळाडूंनी आपण समलैंगिक असल्याचा खुलासा केला आहे.
Heath Davis
Heath DavisTwitter
Published on
Updated on

Gay Cricketer Heath Davis: क्रिकेट जगतातील अनेक महिला खेळाडूंनी आपण समलैंगिक असल्याचा खुलासा केला आहे. हे त्यांनी जाहीरपणे मान्य केले आहे. पण पुरुष क्रिकेटपटूंमध्ये हे सामान्य नाही. आतापर्यंत फक्त दोनच क्रिकेटपटूंनी असा खुलासा केला आहे. पहिला क्रिकेटपटू इंग्लंडचा माजी यष्टिरक्षक स्टीव्हन डेव्हिस होता, ज्याने 2011 च्या सुरुवातीला तो 'समलैंगिक' असल्याचे उघड केले. अशा प्रकारे तो समलिंगी असल्याचे जाहीरपणे मान्य करणारा पहिला पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला.

हीथ हा न्यूझीलंडचा पहिला 'गे' क्रिकेटर

आता ही यादी वाढताना दिसत आहे. आता न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटूनेही आपल्या वैयक्तीक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. हीथ डेव्हिस असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. अशाप्रकारे, तो आता पुरुषांमधील दुसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनला आहे ज्याने समलैंगिक असल्याचे जाहीरपणे कबूल केले आहे. तसेच तो न्यूझीलंडचा पहिला गे क्रिकेटर आहे.

Heath Davis
WI vs IND: 'अर्शदीप छा गये', अर्शदीप सिंगवर भुवीने उधळली स्तुतीसुमने

हीथ डेव्हिसचे वय 50 पेक्षा जास्त असून त्याने आता हा खुलासा केला आहे. तो वेगवान गोलंदाज आहे, त्याने न्यूझीलंडसाठी 5 कसोटी आणि 11 एकदिवसीय सामने खेळले आहेत. हीथ डेव्हिसने हा सामना 1994 ते 1997 दरम्यान खेळला होता. त्याचे देशांतर्गत क्रिकेट मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

'मी समलिंगी आहे हे सगळ्यांना माहीत होतं'

तो सध्या ऑस्ट्रेलियात राहत आहे. हीथने द स्पिनऑफ या ऑनलाइन मासिकाला सांगितले की, 'मला वाटले की हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि मी ते लपवत होतो. त्यात बरंच काही होतं जे मला आयुष्यात बाजूला ठेवायचं होतं. मी एकटा होतो. मी ते माझ्या आत दाबून ठेवलं होतं. मी समलिंगी जीवन जगत नव्हतो.'

Heath Davis
Rohit Sharma आठव्यांदा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शून्यावर आऊट

'मला वाटले की माझ्या आयुष्याचा एक भाग सांगण्याची गरज आहे. आणि तिच गोष्ट मी लपवत होतो. ऑकलंडमधील प्रत्येकाला माहित होते की मी समलिंगी आहे, अगदी संघातही याबाबत माहिती होती. पण हा काही फार मोठा मुद्दा नव्हता. जेव्हा मी 1997 मध्ये माझे मुळ शहर वेलिंग्टनमधून ऑकलंडला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी गेलो होते, यानंतर माझ्या आयुष्यात अनेक सुधारणा झाल्या, असे डेव्हिसने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com