अॅशेस मालिकेतील (Ashes Series) पहिल्या कसोटीत जे काम डेव्हिड वॉर्नरला (David Warner) करता आले नाही ते काम ट्रॅव्हिस हेडने करून दाखवले आहे. 94 धावांवर बाद झाल्यानंतर वॉर्नरचे शतक हुकले पण हेडने ही संधी गमावनी नाही. इंग्लंडविरुद्ध (England) खेळल्या जात असलेल्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने शानदार शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाला ताब्यात घेतले. हेडने तुफानी फलंदाजी करत वेगवान धावा केल्या. त्याने अवघ्या 85 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. अॅशेसमधील हे 'संयुक्त' जलद तिसरे शतक आहे. त्याने 81व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर वोक्सच्या चेंडूवर शानदार चौकार लगावला आणि आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने (Australia) 196 धावांची आघाडी घेतली आहे. दिवसअखेर त्याने सात विकेटच्या मोबदल्यात 343 धावा केल्या, हेड 112 धावांवर नाबाद परतला. त्याने आतापर्यंत केवळ 95 चेंडू खेळले असून 19 चौकारांसह दोन षटकार मारले आहेत.
यापूर्वी हेडने कॅनबेरा येथे श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 161 धावा केल्या होत्या, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक होते. यानंतर त्याने मेलबर्नमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 114 धावांची खेळी केली होती, जे त्याचे कसोटीतील दुसरे शतक होते. हेड बॅटिंगला आला तेव्हा ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथची विकेट गमावली होती. संघाच्या पाठोपाठ डेव्हिड वॉर्नरही काही वेळातच बाद झाला होता. कॅमेरून ग्रीन ना ही हेडला साथ देता आली नाही. येथे ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत सापडला होता आणि त्याला मोठी भागीदारी आणि डावाची गरज होती.ऑस्ट्रेलियाकडून हे नववे सर्वात जलद शतक आहे. ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद शतकाचा विक्रम अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर आहे, ज्याने हे काम पर्थमध्ये केले. त्यानंतर जॉन ग्रेगरी च्या नावावर आहे. डेव्हिड वॉर्नरचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने पर्थमध्ये भारताविरुद्ध 69 चेंडूत शतक झळकावले होते.
आपला कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळत असलेल्या एलेक्स कॅरीने यादरम्यान हेडला साथ दिली आणि दोघांनी 41 धावांची भागीदारी केली. मात्र, कॅरीला डाव वाढवता आला नाही आणि तो 12 रन करून बाद झाला. यानंतर कर्णधार पॅट कमिन्सने हेडसोबत भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान हेडने आपले पाय रोवले आणि त्याने आक्रमक फलंदाजी (Batting) सुरू केली. त्याने काही उत्कृष्ट फटके मारले आणि चौकारांसह छक्के ही मारले. पॅट कमिन्स आणि हेडच्या भागीदारीत हेडने अधिक धावा केल्या. कमिन्स 12 धावा करून बाद झाला. या भागीदारीत हेडने अवघ्या 42 चेंडूत 57 धावा केल्या. कमिन्स बाद झाल्यावर मिचेल स्टार्कने त्याला साथ दिली. यावेळी त्याने आपले शतक पूर्ण केले.
शतक पूर्ण केल्यानंतर हेड गंभीर दुखापतीतून बचावला. त्यानंतर इंग्लंडने दुसरा नवीन चेंडू घेतला. मार्क वुडच्या हातात चेंडू होता. तो 82 वे ओव्हर टाकायला आला होता. पहिलाच चेंडू वुडच्या हातातून निसटला आणि थेट वुडच्या डोक्याला लागली. हेड तिथेच जमिनीवर बसला. वुडने त्याच्या चुकीबद्दल लगेच माफी मागितली. हेड पुन्हा उभा राहिला आणि फलंदाजीला सुरुवात केली. या आधीही हेडला दुखापत झाली होती. 67व्या ओवर मधील पाचव्या चेंडूवर वुडचा चेंडू त्याच्या कोपऱ्याला लागला होता. चेंडू लागल्यानंतर हेडला थोडा त्रास झाला पण त्याने पुन्हा फलंदाजी सुरू केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.