Harmanpreet Kaur: बांगलादेशातील राडा भोवला; कर्णधार हरमनप्रीतवर आयसीसीची कडक कारवाई

ICC: हरमनप्रीत कौरला भारतीय संघासाठी एक कसोटी सामना किंवा दोन एकदिवसीय सामन्यांना मुकावे लागेल.
Harmanpreet Kaur
Harmanpreet KaurDainik Gomantak
Published on
Updated on

ICC took action against Indian Captain Harmanpreet Kaur: ढाका येथे नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात गैरवर्तन केल्याबद्दल भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यावर दोन सामन्यांची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

तिला भारतीय संघासाठी एक कसोटी सामना किंवा दोन एकदिवसीय सामने यापैकी जे प्रथम येईल त्यांना मुकावे लागेल.

हरमनप्रीत कौरला लेव्हल 2 च्या गुन्ह्यासाठी तिच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आणि तिच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डवर तीन डिमेरिट गुण नोंदवण्यात आले.

हरमनप्रीत, खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचार्‍यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.8 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळली आहे. अनुच्छेद 2.8 हा अंपायरच्या निर्णयावर असहमति दर्शविण्याशी संबंधित आहे.

Harmanpreet Kaur
मैदानात उतरताच अवघ्या 16 वर्षीय खेळाडूने FIFA World Cup मध्ये रचला इतिहास!

हरमनप्रीत कौरला 'आंतरराष्ट्रीय सामन्यात घडलेल्या घटनेच्या संदर्भात सार्वजनिक टीका' संबंधित लेव्हल 1 गुन्ह्यासाठी तिच्या मॅच फीच्या 25 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे.

तिने सामन्यानंतर झालेल्या बक्षिस समारंभात, सामन्यातील अंपायरिंगवर उघडपणे टीका केली होती.

शेरे बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर टाय झालेल्या सामन्यात हरमनप्रीतने, ती बाद झाल्यानंतर तिच्या बॅटने स्टंप उडवले होते. आणि मैदानावरील पंचांच्या निर्णयाबद्दल जाहीरपणे टीका केली होती.

Harmanpreet Kaur
Emerging Asia Cup: फक्त पाकिस्तानच नाही, तर भारत सोडून सर्वच संघात खेळले आंतरराष्ट्रीय खेळाडू, एकदा आकडा पाहाच

हरमनप्रीतने बक्षिस समारंभात सामना अधिकार्‍यांवर टीका करताना पंचांच्या निर्णयांना "दयनीय" म्हटले.

तिने बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना आणि तिच्या सहकाऱ्यांना टोमणा मारत, ड्रॉ झालेल्या मालिकेची ट्रॉफी स्वीकारण्यास पंचांनाही बोलवा असे म्हटले होते.

हरमनप्रीतने सर्व आरोप स्वीकारत सामनाधिकाऱ्यांची शिक्षा मान्य केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com