हरमनप्रीत कौरला ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ मध्ये मिळाले स्थान

आतापर्यंत तिने तीन अर्धशतकांच्या मदतीने 399 धावा केल्या आहेत. तिचा स्ट्राइक रेट 135.25 आणि सरासरी 66.5 होता.
Harmanpreet Kaur
Harmanpreet KaurDainik Gomantak
Published on
Updated on

भारताची T20 कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिला या हंगामात मेलबर्न (Melbourne) रेनेगेड्सकडून तिच्या प्रभावी कामगिरीसाठी महिला बिग बॅश लीग (WBBL) च्या अधिकृत ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ मध्ये स्थान देण्यात आले. हरमनप्रीतने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत आपले कर्तृत्व दाखवले आहे. आतापर्यंत तिने तीन अर्धशतकांच्या मदतीने 399 धावा केल्या आहेत. तिचा स्ट्राइक रेट 135.25 आणि सरासरी 66.5 होता.

Harmanpreet Kaur
'बायो बबलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटर्संना अधिक मदतीची गरज': जेसन होल्डर

गेल्या आठवड्यात सिडनी थंडरविरुद्ध त्याने 81 धावा केल्या होत्या. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 18 षटकार मारले आहेत. याशिवाय त्याने 15 विकेट्सही घेतल्या, ज्यामध्ये 22 धावांत तीन विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. सर्वोत्तम इलेव्हनमध्ये स्थान मिळवणारी हरमनप्रीत ही एकमेव भारतीय खेळाडू आहे. तिच्या व्यतिरिक्त, न्यूझीलंडची (New Zealand) अष्टपैलू सोफी डेव्हाईन (Sophie Devine) ही सर्वोत्तम इलेव्हनमध्ये स्थान मिळवणारी दुसरी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com