Hardik Pandya Shares Emotional Video after return to Mumbai Indians for IPL 2024:
इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा लिलाव 19 डिसेंबर रोजी होणार आहे. या लिलावापूर्वी मोठी बातमी समोर आली. गेली दोन वर्षे आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व सांभाळलेला हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. हार्दिक गुजरात संघात जाण्यापूर्वी तब्बल 7 वर्षे मुंबईकडून खेळला होता.
दरम्यान, मुंबई इंडियन्स संघात दोन वर्षांनी घरवापसी झाल्यानंतर हार्दिक भावूक झाला आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघात यापूर्वी खेळलेल्या 7 वर्षांच्या कालावधीतील अनेक क्षण एकत्र करत व्हिडिओ शेअर केला आहे.
त्यात त्याने 8 वर्षांपूर्वीच्या म्हणजेच 2015 आयपीएलच्या लिलावाचेही क्षण शेअर केले आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'कमिंग होम' हे गाणेही वाजत आहे.
हार्दिकने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'यामुळे अनेक सुंदर आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. मुंबई. वानखेडे. पलटन. परत येऊन छान वाटत.'
हार्दिकला 2015 साली झालेल्या आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. मुंबईने हार्दिकला 10 लाखांच्या किंमतीत खरेदी केले होते. त्यानंतर हार्दिकला त्यांनी सलग सात वर्षे म्हणजेच आयपीएल 2021 हंगामापर्यंत संघात कायम केले होते. पण त्यानंतर त्यांनी त्याला करारमुक्त केले.
त्यामुळे आयपीएल 2022 पूर्वी गुजरात टायटन्सने हार्दिकला 15 कोटी रुपयांची किंमत गेत संघात घेतले आणि कर्णधारपदही दिले.
त्यानंतर हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली 2022 साली गुजरातला विजेतेपद मिळवून दिले, तर 2023 साली गुजरात उपविजेते ठरले होते. हार्दिकने गेल्या दोन हंगामात गुजरातसाठी 41.65 च्या सरासरीने 833 धावा केल्या आहेत आणि 11 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच हार्दिकने मुंबई इंडियन्सकडून 2015 ते 2021 या दरम्यान खेळताना 92 सामन्यांमध्ये 1476 धावा केल्या. तसेच 51 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय तो 2015, 2017, 2019 आणि 2020 सालच्या आयपीएल विजेत्या मुंबई संघाचा भागही होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.