Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्सकडून खतरनाक रेकॉर्ड! अष्टपैलू कामगिरीने...

Mumbai Indians: आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak

Hardik Pandya Replaces Rohit Sharma As Mumbai Indians Captain: आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. रोहित शर्मा गेल्या 10 वर्षांपासून संघाचे नेतृत्व करत आहे. पण यावेळी फ्रँचायझीने आगामी हंगामापूर्वी मोठी डील करत हार्दिक पांड्याला पुन्हा संघात सामील करुन घेतले. आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सने आज नेतृत्व बदल करत सर्वांनाच मोठा धक्का दिला.

दरम्यान, हार्दिक पांड्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि फ्रँचायझीसाठी सलग सात हंगाम खेळले. या काळात हार्दिकला 92 सामने खेळण्याची संधी मिळाली ज्यात त्याने 85 डावात फलंदाजी केली आणि 27.33 च्या सरासरीने 1476 धावा केल्या. हार्दिकच्या बॅटमधून चार अर्धशतकांच्या खेळीही पाहायला मिळाल्या. मुंबई इंडियन्सकडून खेळताना हार्दिकने 91 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली आहे.

Hardik Pandya
ट्रेडिंग विंडोचा Mumbai Indians कडून श्रीगणेशा; लिलावाआधीच LSG चा ऑलराउंडर पलटनच्या ताफ्यात

दुसरीकडे, हार्दिकच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास 92 सामन्यात 31.26 च्या सरासरीने त्याने 42 बळी घेतले, ज्यामध्ये 20 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. हार्दिक जेव्हा मुंबई इंडियन्सचा भाग होता तेव्हा संघाने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.

Hardik Pandya
Mumbai Indians: मुंबईला का करावं लागलं IPL 2023 मधून पॅकअप? जाणून घ्या 3 मोठी कारणं

आयपीएलमधील हार्दिक पांड्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड!

IPL च्या 2022 च्या मोसमात, हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स या नवीन फ्रँचायझीचे कर्णधारपद स्वीकारले होते. यानंतर त्याने संघाच्या पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवून दिले होते. 2023 च्या मोसमात हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात संघ अंतिम फेरीत पोहोचला होता पण विजेतेपदाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबई इंडियन्सने अलीकडेच खेळाडूंच्या ट्रेड नियमांनुसार 17 व्या हंगामासाठी हार्दिक पांड्याला 15 कोटीमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. हार्दिकने आतापर्यंत आयपीएलमधील 123 सामन्यांमध्ये 30.38 च्या सरासरीने 2309 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 10 अर्धशतकांचाही समावेश आहे. याशिवाय, त्याने चेंडूवर 33.26 च्या सरासरीने 53 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com