Hardik Natasa Wedding: व्हॅलेंटाइन डेला हार्दिक पांड्याने केले पुन्हा लग्न,पाहा रोमॅंटिक फोटो

हार्दिक पांड्याने पत्नी नताशा स्टेनकोविकशी उदयपुरमध्ये पुन्हा लग्नगाठ बांधली आहे.
Natasa Hardik Wedding photo
Natasa Hardik Wedding photoDainik Gomantak
Published on
Updated on

Natasa Hardik Wedding Photo: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत उदयपूरमध्ये पुन्हा एकदा लग्न केले आहे. उदयपूरमध्ये दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली होती.

14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डेला नताशा आणि हार्दिकने उदयपूरमधील उदयसागर झील या 5 स्टार हॉटेलमध्ये लग्न केले आहे. त्यांच्या लग्नातील पहिला फोटो आता समोर आला आहे. त्यानंतर आज 15 फेब्रुवारी रोजी त्यांनी रिसेप्शन ठेवले आहे.

नताशा आणि हार्दिकचा विवाहसोहळा शाही पद्धतीने पार पडला आहे. लग्नात जी फुले वापरण्यात आली ती दिल्लीवरुन मागण्यात आली होती. लग्नातील फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, 'आम्ही व्हॅलेंटाइन डे साजरा करत आहोत. तीन वर्षांपूर्वी दिलेले वचन आता पूर्ण केले आहे. आमच्या आनंदात कुटुंबीया आणि मित्र परिवार सहभागी झाला त्याबद्दल त्यांचे आभार'. अनेकांनी त्यांच्या लग्नातील फोटोंवर कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Natasa Hardik Wedding photo
CK Nayudu Trophy : अखेरच्या सामन्यातही गोव्याच्या युवकांकडून निराशा

नताशाने लग्नात पांढऱ्या रंगाचा लाँग गाऊन घातला होता. त्यावर तिने मोत्याचे गळ्यातले घातले आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तर दुसरीकडे हार्दिकने काळ्या रंगाचा सूट-बूट घातला आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) त्यांच्या लग्नातील फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. हार्दिक आणि नताशाच्या लग्नाला अनुष्का शर्मा- विराट कोहली, केएल राहूल- अथिया शेट्टी यांनी हजेरी लावली होती.

  • पहिले लग्न 2020 मध्ये झाले होते

हार्दिक आणि नताशा यांनी यावेळी ख्रिश्चन रितीरिवाजाने लग्न केले आहे. याआधी त्यांनी मे 2020 मध्ये पहिल्या संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान लग्न केले होते. यावेळी त्यांचा उदयपूरमध्ये ग्रँड वेडिंग पार पडले.  हार्दिक आणि नताशा यांना अगस्त्य नावाचा मुलगाही आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com