हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार बनू शकतो, सुनील गावस्करांची भविष्यवाणी

हार्दिक चार वेळा IPL विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचा भाग होता पण कर्णधार म्हणून हे त्याचे पहिले विजेतेपद आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaTwitter
Published on
Updated on

इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये हार्दिक पांड्याच्या 'नेतृत्व क्षमतेने' प्रभावित होऊन, माजी महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचा विश्वास आहे की स्टार अष्टपैलू खेळाडू भविष्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी एक प्रबळ दावेदार म्हणून उदयास आला आहे. गेल्या वर्षी T20 विश्वचषकात खराब प्रदर्शनानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणाऱ्या हार्दिकने गुजरात टायटन्सचे नेतृत्व त्याच्या पहिल्याच सत्रात संघाचे विजेतेपद पटकावले, गावस्कर एका स्पोर्ट्स वृत्तवाहिनीशी बोलत असताना असे म्हणाले. (Sunil Gavaskar on Hardik Pandya)

'हे फक्त माझे मूल्यांकन नाही तर सर्वांचे मूल्यांकन आहे. हा त्याच्या खेळाचा एक पैलू होता ज्याबद्दल कोणाला फारशी माहिती नव्हती. जेव्हा तुमच्याकडे नेतृत्व कौशल्य असेल, तेव्हा येणाऱ्या भविष्यात भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून सन्मानित होण्याचा मार्ग आपोआप खुला होतो, हे रोमांचक आहे, शर्यतीत आणखी तीन-चार नावे आहेत. मी असे म्हणणार नाही की पुढील एक समान असेल परंतु निवड समितीकडे पर्याय असणे हे आश्चर्यकारक आहे. असे म्हणत गावस्कर यांनी पांड्याबद्दल एक आशावाद व्यक्त केला.

Hardik Pandya
ब्रेट लीने केलं उमरानबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाला असे खेळाडू भारतीय क्रिकेटसाठी...

कमी धावसंख्येच्या अंतिम सामन्यात, हार्दिकने गुजरात टायटन्सला 17 धावांत तीन गडी बाद केल्यानंतर माजी चॅम्पियन राजस्थान रॉयल्सवर 30 चेंडूत 34 धावांनी सात गडी राखून विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हार्दिकने टूर्नामेंटमध्ये 487 धावा करत आठ विकेट्स घेतल्या.

"तो बॅटने काय करू शकतो, चेंडूने काय करू शकतो हे आम्हा सर्वांना माहीत आहे, परंतु हंगाम सुरू होण्यापूर्वी तो आपल्या कोट्यातील पूर्ण षटके टाकू शकेल की नाही याची चिंता होती. त्याने ते केले, ते करून दाखवले. अष्टपैलू खेळाडूची ही बाजू पूर्ण झाली असून सर्वजण आनंदी आहेत," असे म्हणत गावस्कर यांनी हार्दिकचे कौतूक केले.

Hardik Pandya
चहलची पत्नी धनश्री सोबतचा जोस बटलरचा डान्स व्हिडीओ झाला व्हायरल

हार्दिक हा चार वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचा भाग होता पण कर्णधार म्हणून हे त्याचे पहिले विजेतेपद आहे. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीच्या बळावर हार्दिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मायदेशातील टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. या संघाची कमान लोकेश राहुलकडे सोपवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com