साहाला धमकी देणाऱ्या पत्रकारावर भज्जी भडकला, 'रिद्धी तु त्याचे नाव सांग मग...'

टीम इंडियाचा (Team India) प्रसिध्द यष्टीरक्षक असणाऱ्या ऋद्धिमान साहाने एका प्रसिद्ध पत्रकाराकडून आपल्याला धमकी दिल्याचा मोठा खुलासा केला आहे.
Harbhajan Singh
Harbhajan SinghDainik Gomantak
Published on
Updated on

टीम इंडियाचा प्रसिध्द यष्टीरक्षक असणाऱ्या ऋद्धिमान साहाने एका प्रसिद्ध पत्रकाराकडून आपल्याला धमकी दिल्याचा मोठा खुलासा केला आहे. त्यानंतर क्रिकेट क्षेत्रामधील दिग्गजांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सेहवागनंतर आता हरभजन सिंग (Harbhajan Singh) ट्विट करत साहाच्या समर्थनात उतरला आहे. भज्जीने ट्विट करुन साहाला असे कृत्य करणाऱ्या पत्रकाराचे नाव सांगण्यास आवाहन केले आहे. मात्र, ऋद्धिमानने (Wriddhiman Saha) यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भज्जीने थेट आपल्या ट्विटमध्ये म्हटलयं की, 'रिद्धी तु फक्त त्या व्यक्तीचे ना सांग जेणेकरुन क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांना कळेल की असे कोण काम करत आहे. अन्यथा चांगले लोकही संशयाच्या भोवऱ्यात येतील.. ही कसली पत्रकारिता आहे..' भज्जीने सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि बीसीसीआयलाही (BCCI) आपल्या ट्विटमध्ये टॅग केले आहे. (Harbhajan Singh Gets Angry At A journalist Who Threatened Riddhiman Saha)

दरम्यान, शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये ऋद्धिमान साहाचे नाव नव्हते. त्याच्या जागी केएस भरतचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. निवडकर्त्यांनी भारतीय संघाची घोषणा करताच, स्पोर्ट्स पोर्टलवरील साहाची मुलाखतही प्रसिद्ध झाली, ज्यामध्ये त्याने आपली नाराजी व्यक्त केली.

Harbhajan Singh
ऋद्धिमान साहा चा मोठा खुलासा, गांगुली ने म्हटलं होतं, ‘जब तक मैं BCCI में हूं...

साहाच्या या खुलाशावर सेहवागने सर्वप्रथम प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले की, 'मी खूप दुःखी आहे. रिद्धी मी तुझ्या सोबत आहे.'

साहाने कानपूर कसोटीचा तो किस्सा सांगितला

गतवर्षी नोव्हेंबर अखेरीस खेळल्या गेलेल्या त्या कसोटीदरम्यान ऋद्धिमान साहाला मानदुखीचा त्रास झाला होता. त्यामधूनही त्याने 61 धावांची शानदार खेळी केली होती. मानदुखीचा त्रास एवढा वाढला होता की, तो सामना साहाला अर्ध्यातच सोडावा लागला होता. त्यानंतर केएस भरतला संघात स्थान देण्यात आले होते. तसेच तेव्हा साहाच्या त्या खेळीचे गांगुलीकडून कौतुकही करण्यात आले होते. त्यावेळी साहाने म्हटले होते की, “न्यूझीलंडविरुद्ध 61 धावांच्या नाबाद खेळीनंतर दादांनी (Ganguly) मला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करुन अभिनंदन केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, ''जोपर्यंत मी बीसीसीआयमध्ये आहे, तोपर्यंत तु संघात राहणार.''

Harbhajan Singh
IPL 2021: 'मैं पाकिस्तान जा रहा हूं' म्हणत गेलने क्रिकेटप्रेमींना केले आश्चर्यचकित

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन (फिटनेसवर अवलंबून), रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि सौरभ कुमार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com