Video Viral: चालू सामन्यात हार्दिक - गुरबाज एकमेकांना भिडले! सोशल मीडियावरही उमटल्या प्रतिक्रिया

शनिवारी झालेल्या आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सचाचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर रेहमनुल्लाह गुरबाज यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसले.
Hardik Pandya vs Rahmanullah Gurbaz
Hardik Pandya vs Rahmanullah GurbazDainik Gomantak
Published on
Updated on

Hardik Pandya and Rahmanullah Gurbaz Exchange Words: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी दोन सामने खेळवण्यात आले होते. या दिवशी पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने 7 विकेट्सने सहज हा सामना जिंकला. मात्र, या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि कोलकाताचा सलामीवीर रेहमनुल्लाह गुरबाज यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसले.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. यावेळी एका बाजूने कोलकाताने महत्त्वाच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या होत्या. पण दुसऱ्या बाजूने रेहमनुल्लाह गुरबाजने आक्रमक फलंदाजी करताना अर्शतकी खेळी केली. त्याने गुजरातच्या जवळपास सर्वच गोलंदाजांवर आक्रमण केले.

Hardik Pandya vs Rahmanullah Gurbaz
IPL 2023: पंजाबविरुद्ध 56 धावांनी विजय मिळवूनही लखनऊला धक्का! मॅच विनर खेळाडूच झाला जखमी

गुरबाजने हार्दिक पंडयाच्या गोलंदाजीवरही खणखणीत षटकार ठोकले. मात्र, हा सामना सुरु असताना एका क्षणी गोलंदाजी करणाऱ्या हार्दिकशी गुरबाज काहीतरी बोलायला गेल्याचे दिसले. यावेळी त्याने हार्दिकला मिठीही मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर हार्दिक पंड्याला ते आवडले नसल्याचे दिसले, तसेच तो गुरबाजवर चिडल्याचेही दिसले.

त्यानंतर तो पंचांशीही रागात बोलत असल्याचे दिसले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. तसेच या घटनेबद्दल सोशल मीडियावरही बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक युजर्सने हार्दिकची चूक असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेकांनी हार्दिकच्या वागणूकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पण, गुरबाज हार्दिकला नक्की काय म्हणाला होता, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Hardik Pandya vs Rahmanullah Gurbaz
IPL 2023: गुजरातने कोलकाताला पराभूत करत गाठला अव्वल क्रमांक! गुरबाजची 81 धावांची खेळी व्यर्थ

गुजरातने जिंकला सामना

दरम्यान, या सामन्यात गुरबाजने 39 चेंडूत 5 चौकार आणि 7 षटकारांसह 81 धावांची खेळी केली. त्यामुळे कोलकाताने 20 षटकात 7 बाद 179 धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग गुजरातने 17.5 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. गुजरातकडून विजय शंकरने आक्रमक खेळ करताना 24 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 51 धावांची नाबाद खेळी केली. तसेच त्याने डेव्हिड मिलरबरोबर 87 धावांची नाबाद भागीदारी केली. मिलर 32 धावांवर नाबाद राहिला.

त्याआधी शुभमन गिलने 49 धावांची खेळी केली होती. कोलकाताकडून हर्षित राणा, आंद्रे रसेल आणि सुनील नारायण या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com