ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Netherlands, Best Fielder Video
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरु झाल्यापासून भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये एक परंपरा सुरु झाली आहे, ज्याच सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय संघाच्या प्रत्येक सामन्यानंतर संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाची क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांच्याकडून ड्रेसिंग रुममध्ये घोषणा केली जाते.
त्यानुसार रविवारी (12 नोव्हेंबर) नेदरलँड्सविरुद्ध बंगळुरूमध्ये 160 धावांनी विजय मिळवल्यानंतरही सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक देण्यात आले.
दरम्यान, प्रत्येक सामन्यानंतर टी दिलीप यांच्याकडून सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाची घोषणा विविध पद्धतीने केली जाते. त्याचनुसार रविवारी सूर्यकुमार यादवचे नाव सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ग्राऊंडस्टाफकडून जाहीर करण्यात आले.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की नेहमीप्रमाणे सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडू आणि इतर सपोर्ट स्टाफ सदस्य ड्रेसिंग रुममध्ये बसलेले दिसत आहे.
यावेळी टी दिलीप यांनी सांगितले की दरवेळी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे उमेदवार ड्रेसिंग रुममध्ये जाहीर केले जातात आणि बाहेर विजेत्याची घोषणा होते. पण यावेळी उमेदवारही बाहेरच जाहीर केले जातील. तसेच त्यांनी सांगितले की सपोर्ट स्टाफ सदस्य नुवान या सामन्यानंतर पदक प्रदान करेल.
त्यानंतर सर्व खेळाडू मैदानावर आले. यानंतर दिलीप यांनी जडेजाच्या शानदार क्षेत्ररक्षणाचे कौतुक करत तो पहिला उमेदवार असल्याचे सांगितले. त्यानंतर सूर्यकुमार यादवला दुसरा उमेदवार जाहीर करण्यात आले, तर केएल राहुलला तिसरा उमेदवार म्हणजे जाहीर करण्यात आले.
या तिन्ही उमेदवारांची नावं बिग स्क्रिनवर ज्याप्रमाणे डीआरएस रिव्ह्यूसाठी सुचना दिल्या जातात, त्यानुसार जाहीर करण्यात आली. त्यानंतर ग्राऊंड स्टाफच्या सदस्यांनी सुर्याचे नाव जाहीर केले. यानंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी जल्लोष केला. त्यानंतर नुवान यांनी सूर्याला पदक घातले.
दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने या सामन्यात 50 षटकात 4 बाद 410 धावा केल्या होत्या. त्यानंतर 411 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ 47.5 षटकात 250 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने 160 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा वर्ल्डकप 2023 मधील सलग नववा विजय होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.