IND vs NZ : जागतिक कसोटीचा अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना हिरवा कंदील 

A green lantern for spectators to watch the final of the World Test 
A green lantern for spectators to watch the final of the World Test 
Published on
Updated on

लंडन : भारत (India) विरुद्ध न्युझीलँड (New Zealand) यांच्यात इंग्लंडमध्ये (England) होणाऱ्या जागतिक कसोटीचा सामना मैदानात जाऊन पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट रसिकांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.  या सामन्यासाठी 4 हजार प्रेक्षक उपस्थित राहतील.अशी माहिती कौंटी (county) क्लबचे प्रमुख रॉड ब्रान्सग्रोव (Rod Bransgrove) यांनी दिली आहे.(A green lantern for spectators to watch the final of the World Test)

इंग्लंडमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असून तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. जागतिक कसोटीचा अंतिम सामना 18 जून पासून सुरु होणार आहे. सप्टेंबर 2019 नंतर इंग्लंडमध्ये प्रथमच एखादा आंतरराष्टीय सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. उद्यापासून कौंटी सामन्यांची सुरुवात होत असून त्याला देखील थोड्याफार प्रमाणात प्रेक्षकांना परवानगी असेल. असे त्यांनी सांगितले. 

भारतीय संघ सध्या भारतात दोन आठवड्यांच्या विलगीकरण कक्षात असून, 2 जूनला तो लंडनला रवाना होणार आहे. तेथे गेल्यावर देखील 10 दिवस संघ विलगीकरण कक्षात राहील पण या दरम्यान त्यांना सरावाची परवानगी आहे. भारतीय संघ लंडनमध्ये कधी दाखल होतो याची आम्ही वाट पाहत आहोत. त्यांच्या यजमान पदासाठी आम्ही उत्सुक आहोत. असे ब्रान्सग्रोव यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com