संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या पश्चिम विभागीय फेरीत गोव्याचा सहभाग!

संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या पश्चिम विभागीय फेरीसाठी गोव्याच्या संघाची नेमणुक करण्यात आली.
Football competitions
Football competitionsDainik Gomantak

संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या (Football competitions) पश्चिम विभागीय फेरीसाठी गोव्याचा संघ शनिवारी जाहीर करण्यात आला. गोव्याचे सामने गुजरातमधील भावनगर येथे खेळले जाणार आहेत.

स्पर्धेसाठी वीस सदस्यीय संघ निवडण्यात आला आहे. निवड झालेल्या खेळाडूंनी 15 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते अडीच या कालावधीत संघाचे व्यवस्थापक कॉस्मे ऑलिव्हेरा (Cosme Olivera) यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे. लेव्हिनो अँथनी परेरा संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

Football competitions
एखाद्या खेळाडूला अशाप्रकारे लक्ष्य करणे चुकीचे

गोव्याचा पश्चिम विभागीय अ गट फेरीत पहिला सामना 24 नोव्हेंबरला दमण-दीव संघाविरुद्ध होईल. नंतर 26 नोव्हेंबरला दादरा आणि नगर हवेली संघाविरुद्ध, तर गुजरातविरुद्ध 28 नोव्हेंबरला सामना होईल.

गोव्याचा संघ : शालम पिरीस, जेसन डिमेलो, अंतोनियो डायलन डिसिल्वा, ओझेन सिल्वा, क्लाईव्ह मिरांडा, कृष्णनाथ शिरोडकर, मायरन परेरा, लँडन मेंडोसा, उमंग गायकवाड, सॅम्युएल कॉस्ता, कीर्तीकेश गडेकर, दत्तराज गावकर, साईश बागकर, सूरज हडकोणकर, अकेराज मार्टिन्स, डॅरील कॉस्ता, ज्योवियल डायस, मेव्हन डायस, कुणाल साळगावकर, कॅल्विन बार्रेटो, राखीव : गिरीश नाईक, विष्णू गोसावी.

अधिकारी : लेव्हिनो अँथनी परेरा (मुख्य प्रशिक्षक), सेव्हेरिनो फर्नांडिस (सहाय्यक प्रशिक्षक), कॉस्मे ऑलिव्हेरा (व्यवस्थापक), मारियो आगियार (गोलरक्षक प्रशिक्षक), मेलिसा लुईस (फिजिओथेरपिस्ट).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com