Mount Everest: शाब्बास! गोव्याच्या 'गुंजन'ची एव्हरेस्टला साद, बेस कॅम्प केला सर

सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Gunjan Narvekar
Gunjan NarvekarDainik Gomantak

जगातील सर्वात उंच पर्वत असलेल्या माउंट एव्हरेस्टचा (Mount Everest) बेस कॅम्प गोव्याच्या गुंजन नार्वेकरने (Gunjan Narvekar) सर केला आहे. गुंजनने आठ दिवसात 5,364 मीटर उंची गाठली आहे. गुंजन नार्वेकर बेस कॅम्प सर करणारी सर्वात तरूण गिर्यारोहक ठरली आहे. तिच्या या कामगिरी बद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

(Goan Gunjan Narvekar completed peak winter Mount Everest Base Camp Trek in 8 days)

Gunjan Narvekar
Mohan Bhagwat: RSS सरसंघचालक मोहन भागवत गोव्यात दाखल, मंगेशीत कडेकोट बंदोबस्त

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी देखील गुंजनचे कौतुक केले आहे. 'माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केल्याबद्दल गुंजनला खूप शुभेच्छा. आठ दिवसात बेस कॉम्प सर करणारी सर्वात तरूण गिर्यारोहक ठरली आहे. गिर्यारोहणात तिला उज्वल भविष्य आहे. तिला माझ्याकडून शुभेच्छा.' असे ट्विट मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे.

Gunjan Narvekar
Pandharpur: प्रेमविवाहाला नकार दिल्याने वडिलांची दगडाने ठेचून हत्या, पंढपूरमधील घटना

यापूर्वी देखील मागील वर्षी गोव्याच्या आठ वर्षीय ऑस्कर पाशेको या लहान मुलाने एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला होता.  4 एप्रिल 2022 रोजी त्याने आपली ही मोहीम पूर्ण केली. आपल्या वडिलांसोबत ऑस्करने ही कामगिरी केली होती.

समुद्रसपाटीपासून जगातील सर्वात उंच असलेला माउंट एव्हरेस्ट 60 दशलक्षांपेक्षा जास्त म्हणजे 6 करोड वर्षे जुना आहे. कमी तापमान आणि ऑक्सिजन पातळीमुळे माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात धोकादायक पर्वतांपैकी एक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com