गोव्याने साकारला रोमहर्षक विजय !

गोव्याने (Goa) 25 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी पुदुचेरी येथे रोमहर्षक विजय साकारला.
गोव्याने साकारला रोमहर्षक विजय
गोव्याने साकारला रोमहर्षक विजयDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याने (Goa) 25 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी पुदुच्चेरी (Puducherry) येथे रोमहर्षक विजय साकारला. शेवटच्या चेंडूवर विजयी ठरलेला अवांतर चौकार मिळाल्यामुळे त्यांनी हरियाणास (Haryana) 6 विकेट राखून हरविले. पावसामुळे एकदिवसीय सामना प्रत्येकी 20 षटकांचा खेळविण्यात आला.

सलामीचा मंथन खुटकर आणि कश्यप बखले यांनी धडाकेबाज आक्रमक फलंदाजी करताना केलेली 132 धावांची भागीदारी गोव्याच्या विजयात निर्णायक ठरली. मंथनने 67, तर कश्यपने 77 धावा केल्या. सलामीचा वैभव गोवेकर संघाची धावसंख्या पाच असताना जायबंदी झाल्याने माघारी परतला. नंतर कश्यप व मंथन जोडी एकत्र आली आणि त्यांनी हरियानाच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवत संघाला भक्कम पायाभरणी करून दिली.

गोव्याने साकारला रोमहर्षक विजय
पावसामुळे फक्त दोन चेंडूंचाच खेळ

गोव्यासमोर विजयासाठी 185 धावांचे आव्हान होते. विसाव्या षटकांतील शेवटच्या चेंडूवर 4 विकेट विकेट गमावून गोव्याने लक्ष्य गाठले. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर सलामीच्या व्ही. ए. भारद्वाज (108) याच्या झंझावाती नाबाद शतकामुळे हरियानाने 4 बाद 184 धावा केल्या होत्या.

गोव्याला शेवटच्या दोन षटकांत विजयासाठी 21 धावांची गरज होती. नंतर आठ चेंडूंत16 धावांची आवश्यकता असताना जम बसलेला कश्यप बाद झाला, त्यानंतर निहाल सुर्लकर व आलम खान यांनी आक्रमकता जोपासत गोव्याचा संघ ढेपाळणार नाही याची दक्षता घेतली. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना गोव्याने पंधराव्या षटकापासून 32 धावांत 4 विकेट गमावल्या. मंथन, कर्णधार सुयश प्रभुदेसाई, संकेत मोरजकर व कश्यप बाद झाल्यामुळे गोव्याची बिनबाद 137 वरून 4 बाद 169 अशी स्थिती झाली. सुयश सोळाव्या षटकात धावबाद झाल्याने गोव्याला धक्का बसला, पण नंतर फलंदाजांनी धावगतीकडे लक्ष ठेवत फलंदाजी केली.

संक्षिप्त धावफलक

हरियाना : 20 षटकांत 4 बाद 184 (व्ही. ए. भारद्वाज नाबाद 108, हेरंब परब 4-0-44-1, निहाल सुर्लकर 4-0-32-0, सुयश प्रभुदेसाई 4-0-45-1 वेदांत नाईक 4-0-34-0, धीरज यादव 4-0-29-2) पराभूत वि. गोवा : 20 षटकांत 4 बाद 185 (वैभव गोवेकर जखमी निवृत्त 1, मंथन खुटकर 67, कश्यप बखले 77, सुयश प्रभुदेसाई 5, संकेत मोरजकर 9, निहाल सुर्लकर नाबाद 9, आलम खान नाबाद 9, अंशुल कंबोज 1-30, जे. ए. भांभू 1-,38 लक्ष्यसुमन दलाल 1-38).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com