Goa University Football: डीएम्स, सीईएस, काकुलो महाविद्यालयांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

साखळी महाविद्यालयाचीही आगेकूच
Pranay Gaokar | Goa University Intecollege Football
Pranay Gaokar | Goa University Intecollege FootballDainik Gomantak
Published on
Updated on

Goa University Intecollege Football: गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष फुटबॉल स्पर्धेत आसगावचे डीएम्स महाविद्यालय, कुंकळ्ळीचे सीईएस महाविद्यालय, म्हापशाचे श्रीदोरा काकुलो महाविद्यालय, साखळी सरकारी महाविद्यालयाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

ताळगाव पठारावरील विद्यापीठ मैदानावर बुधवारी झालेल्या लढतीत डीएम्स महाविद्यालयाने वेर्णा येथील पाद्री कोसेसाव अभियांत्रिकी महाविद्यालयास 2-0 असे हरविले, दोन्ही गोल विस्मय डावरे याने केले. त्याने 15 व 30 व्या मिनिटास गोल नोंदविला.

Pranay Gaokar | Goa University Intecollege Football
Shikhar Dhawan Divorce: पत्नीने केलेल्या क्रूरतेच्या आधारावर शिखर धवनला कोर्टाकडून घटस्फोट मंजूर

अन्य लढतीत सीईएस महाविद्यालयाने बोरीच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा 7-0 फरकाने धुव्वा उडविला. प्रणय गावकर याने हॅटट्रिक साधली, तर संदीप चौधरीने दोन, तर प्रणय वेळीपने एक गोल नोंदविला.

नावेली येथील रोझरी मैदानावर श्रीदारो काकुलो महाविद्यालयाने आसगावच्या आग्नेल इन्स्टिट्यूटचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. नरेंद्र नाईक व अमन गोवेकर यांनी प्रत्येकी दोन, तर साईदीप पोंबुर्फेकर याने एक गोल नोंदविला.

Pranay Gaokar | Goa University Intecollege Football
World Cup 2023: बिर्याणी, भारतातील स्वागत..., बाबर आझमची वर्ल्डकपपूर्वी दिलखुलास उत्तरं

आणखी एका उपउपांत्यपूर्व सामन्यात चुरस पाहायला मिळाली. अटीतटीच्या लढतीत साखळी सरकारी महाविद्यालयाने विहाल दास याने 68 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे पेडणे सरकारी महाविद्यालयास एका गोलने निसटते हरविले.

दरम्यान, आंतमहाविद्यालयीन महिला फुटबॉल स्पर्धेत तिर्था कुंकळ्येकर हिने नोंदविलेल्या चार शानदार गोलच्या बळावर फर्मागुढीच्या गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने आसगावच्या आग्नेल इन्स्टिट्यूटला 4-0 असे सहज हरविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com