राष्ट्रीय स्पर्धा पुढच्या वर्षी होण्याची शक्यता

गोवा ऑलिंपिक असोसिएशन आशावादी, ‘IOA’च्या निर्णयाकडे लक्ष
कांपाल येथील जलतरण तलाव प्रकल्पाचे सुरू असलेल्या कामाचे संग्रहित छायाचित्र.
कांपाल येथील जलतरण तलाव प्रकल्पाचे सुरू असलेल्या कामाचे संग्रहित छायाचित्र.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्‍यातील नियोजित 36व्या राष्ट्रीय क्रीडा (36th National Games) स्पर्धेसाठी तयार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांनी विश्वास व्यक्‍त केल्यानंतर, वारंवार लांबणीवर पडलेली स्पर्धा पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होण्याचा आशावाद गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे (GOA) सचिव गुरुदत्त भक्ता यांनी व्यक्त केला.

कांपाल येथील जलतरण तलाव प्रकल्पाचे सुरू असलेल्या कामाचे संग्रहित छायाचित्र.
आशियाई पात्रता स्पर्धेसाठी प्रिन्सटनची निवड

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत आता भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (IOA) निर्णयाकडे लक्ष असेल. आयओएची आमसभा डिसेंबरमध्ये नियोजित आहे. त्यावेळी गोव्यातील स्पर्धेविषयी निर्णय होईल, असे भक्ता यांनी नमूद केले. 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2020 या कालावधीत स्पर्धा गोव्यात होणार होती, पण कोरोना विषाणू महामारीमुळे स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकण्यात आली होती. गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या आमसभेत मंगळवारी मुख्यमंत्री सावंत यांनी स्पर्धा आयोजनाबाबत दृढनिश्चय व्यक्त केला. त्यामुळे स्पर्धा घेण्यास गोवा सरकार ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कांपाल येथील जलतरण प्रकल्प वगळता सर्व कामे जवळपास पूर्ण झाली असून जलतरण तलावाचे कामही वेगाने सुरू आहे, त्यामुळे पुढील वर्षी नोव्‍हेंबरमध्ये मुहूर्त स्पर्धेसाठी उपयुक्त ठरू शकतो, असे भक्ता यांना वाटते.

कांपाल येथील जलतरण तलाव प्रकल्पाचे सुरू असलेल्या कामाचे संग्रहित छायाचित्र.
T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात मोठा बदल

जुलै ते सप्टेंबरमध्ये प्रमुख स्पर्धा

पुढील वर्षी दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, तर १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत चीनमधील हँगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. त्यामुळे गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तारीख या दोन्ही स्पर्धांनंतरच आयओए निश्चित करू शकते. राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेनंतर पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये गोव्यात स्पर्धा घेण्यास आयओए अनुकूल असेल. पुढील वर्षीच्या सुरवातीस राज्य विधानसभेची निवडणूक आहे, तसेच राज्यातील पावसाळा लक्षात घेता, पुढील वर्षी उत्तरार्धातच गोव्यात राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन होऊ शकते, असे जाणकारांना वाटते.

‘‘राष्ट्रीय स्पर्धेची तारीख आयओए निश्चित करेल. त्यांच्या बैठकीस जीओएचा प्रतिनिधी या नात्याने मी उपस्थित असेन, तसेच त्या बैठकीस सरकारचा प्रतिनिधीही हजर राहावा अशी सूचना मी राज्य सरकारला केली आहे.’’

- गुरुदत्त भक्ता, सचिव, गोवा ऑलिंपिक असोसिएशन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com