State Chess Competition : राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत 'शारदा मंदिर,' 'भाटीकर'ची मोहोर..

राज्य क्रीडा आयोजक अनंत सावळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा
State Chess Competition
State Chess CompetitionDainik Gomantak

Panaji : क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या १७ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मुलांत मिरामार येथील शारदा मंदिर स्कूलने, मुलींत मडगावच्या भाटीकर मॉडेल हायस्कूलने विजेतेपद पटकावले. स्पर्धा मिरामार येथील यूथ हॉस्टेलमध्ये गुरुवारी झाली.

मुलांच्या गटात विजेतेपद पटकावताना शारदा मंदिर स्कूलने अंतिम लढतीत मडगावच्या मनोविकास इंग्लिश स्कूलचा ३-१ डाव फरकाने पराभव केला. तिसरा क्रमांक म्हापशाच्या जी. एस. आमोणकर विद्यामंदिराने मिळविला. त्यांनी झुआरीनगरच्या भारतीय विद्या भवनाच्या नारायण बांदेकर स्कूलवर ४-२ फरकाने मात केली.

मुलींच्या अंतिम लढतीत भाटीकर मॉडेल हायस्कूलने दोना पावलाच्या अवर लेडी ऑफ रोझरी हायस्कूलला ४-३ डाव फरकाने हरविले.

State Chess Competition
Goa Traffic Cell - महसूल मिळवण्यासाठीच पर्यटकांना दंड - मायकेल | Gomantak TV

फोंड्याच्या ए. जे. आल्मेदा हायस्कूलने तिसरा क्रमांक मिळवताना म्हापशाच्या जी. एस. आमोणकर विद्यामंदिर शाळेला ४-२ असे पराजित केले.

खात्याचे राज्य क्रीडा आयोजक अनंत सावळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाली. दत्ताराम पिंगे स्पर्धेचे मुख्य आर्बिटर होते. बक्षीस वितरण क्रीडा खात्याचे साहाय्यक संचालक जॉन फर्नांडिस, क्रीडा अधिकारी पांडुरंग नाईक यांच्या उपस्थितीत झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com