गोव्याच्या मुलींचा सलग दुसरा पराभव

मुलींच्या क्रिकेटमध्ये बंगालची 7 बाद 19 वरून विजयी कामगिरी
मुलींच्या क्रिकेटमध्ये बंगालची 7 बाद 19 वरून विजयी कामगिरी
मुलींच्या क्रिकेटमध्ये बंगालची 7 बाद 19 वरून विजयी कामगिरीDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बंगाल संघाची (Team) 7 बाद 19 अशी स्थिती असताना गोव्याच्या (Goa) 19 वर्षांखालील (years) मुलींच्या संघाला सामन्यावर पकड एकदम घट्ट करता आली नाही. त्यांनी अनुकूल स्थिती गमावल्यामुळे एकदिवसीय क्रिकेट (Cricket) स्पर्धेच्या एलिट ब गटात सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

मुलींच्या क्रिकेटमध्ये बंगालची 7 बाद 19 वरून विजयी कामगिरी
गोव्यातील जनता सुशिक्षित आहे ते योग्य पक्षाला आपला कौल देतील; अस्नोडकर

स्पर्धेतील सामना शुक्रवारी सिव्हिल लाईन्स-नागपूर येथील व्हीसीए स्टेडियमवर झाला. पावसामुळे षटके कमी करण्यात आलेल्या लढतीत गोव्याने नाणेफेक जिंकून बंगालला फलंदाजीस पाचारण केले. बंगालने निर्धारित 37 षटकांत 8 बाद 130 धावा केल्या, उत्तरादाखल गोव्याला 9 बाद 68 धावांची मजल मारता आली. बंगालने सामना 62 धावांनी जिंकून पूर्ण चार गुणांची कमाई केली. गुरुवारी दिल्लीविरुद्ध 37 धावांत गारद झालेल्या गोव्याच्या मुलींचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

मुलींच्या क्रिकेटमध्ये बंगालची 7 बाद 19 वरून विजयी कामगिरी
कोरोना नियंत्रणासाठी सरकारने राज्यात 3 कोटी 30 लाख रुपये केले मंजूर

गोव्याच्या सावली कोळंबकर (8-5-8-3) व मेताली गवंडर (8-2-13-3) यांनी नव्या चेंडूने एकत्रितपणे सलग सोळा षटके टाकली. त्यांच्या भेदक माऱ्यासमोर बंगालची 14.1 षटकांत 7 बाद 19 अशी दयनीय स्थिती झाली. त्यानंतर ह्रषिता बसू (43, 70 चेंडू, 7 चौकार) हिने श्रीलेखा रॉय (नाबाद 33, 64 चेंडू, 5 चौकार) यांनी आठव्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी करून बंगालला सावरले. दहाव्या क्रमांकावरील प्रियोसी अईच हिने नाबाद 18 धावा केल्यामुळे बंगालला सव्वाशे धावा पार करता आल्या. गोव्यातर्फे कर्णधार इब्तिसाम शेख (15) व मृण्मयी भिके (15) यांनी चांगली सुरवात केली, मात्र नंतर पियाली घोष (3-8) व स्नेहा गुप्ता (2-14) यांच्या गोलंदाजीसमोर गोव्याचा डाव गडगडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com