चेन्नईयीनची विजयी घोडदौड..!

आयएसएल फुटबॉल : छांगटे, थापा यांच्या गोलमुळे नॉर्थईस्टवर मात
Goa Sports :  आयएसएल फुटबॉल स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध सोमवारी चेन्नईयीनला आघाडी मिळवून दिल्यानंतर आनंदित झालेला लाल्लियानझुआला छांगटे.
Goa Sports : आयएसएल फुटबॉल स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध सोमवारी चेन्नईयीनला आघाडी मिळवून दिल्यानंतर आनंदित झालेला लाल्लियानझुआला छांगटे.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी Goa Sports : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल Football स्पर्धा दोन वेळा जिंकलेल्या चेन्नईयीन एफसीने आठव्या मोसमात विजयी घोडदौड कायम राखली. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्यांनी सोमवारी नॉर्थईस्ट युनायटेडला 2-1 फरकाने पराजित केले. बोझिदार बँडोविच यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने सलग दुसरा सामना जिंकून पूर्ण गुणाची कमाई केली.

Goa Sports :  आयएसएल फुटबॉल स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध सोमवारी चेन्नईयीनला आघाडी मिळवून दिल्यानंतर आनंदित झालेला लाल्लियानझुआला छांगटे.
Goa: पार्थ साळवी बुद्धिबळात विजेता

चेन्नईयीनला लाल्लियानझुआला छांगटे याने 41व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली, नंतर 74व्या मिनिटास कर्णधार अनिरुद्ध थापा याने केलेल्या गोलमुळे त्यांना स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदविता आला. चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याच्या चुकीचा लाभ उठवत व्ही. सुहेर याच्या गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडने 50व्या मिनिटास बरोबरी साधली होती, पण त्यांना नंतर चेन्नईयीनचा बचाव भेदता आला नाही. नॉर्थईस्ट युनायटेडच्या बचावफळीत त्रुटी होत्या, त्याचा लाभ चेन्नईयीन संघाने उठवत दोन गोल डागले.

खलिद जमिल यांच्या मार्गदर्शनाखालील गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडचा हा तीन लढतीतील दुसरा पराभव ठरला. त्यामुळे त्यांचा एक गुण कायम राहिला. चेन्नईयीनने अगोदरच्या लढतीत हैदराबादला एका गोलने हरविले होते, आज आणखी एक विजय मिळविल्यामुळे त्यांचे सहा गुण झाले आहेत. त्यांनी गुणतक्त्यात एटीके मोहन बागानला गाठले. आयएसएल स्पर्धेतील एकमेकांविरुद्धच्या 15 लढतीत चेन्नईयीनने नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध नोंदविलेला हा चौथा विजय ठरला.

Goa Sports :  आयएसएल फुटबॉल स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध सोमवारी चेन्नईयीनला आघाडी मिळवून दिल्यानंतर आनंदित झालेला लाल्लियानझुआला छांगटे.
दीपची प्रभावी फिरकी!

सामन्याच्या 23व्या मिनिटास नॉर्थईस्ट युनायटेडला झटका बसला. त्यांचा हुकमी परदेशी खेळाडू फेडेरिको गालेगो याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याचा परिणाम संघाच्या नियोजनावर झाला. गालेगोला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेल्यानंतर, जायबंदी खेळाडूची जागा पॅट्रिक फ्लॉटमॅन याने घेतली.

दृष्टिक्षेपात...

- लाल्लियानझुआ छांगटे याचा यावेळचा पहिलाच, तर 80 लढतीत 20वा गोल

- अनिरुद्ध थापा याचे 71 लढतीत 6 गोल, यंदा पहिलाच गोल

- व्ही. सुहेर याचे 22 सामन्यांत 4 गोल, यंदा 2 लढतीत प्रथमच गोल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com