Goa Professional League :वास्कोने `साळगावकर`ला नमविले

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेल्या लढतीत वास्कोच्या (Vascos) संघाने 1-0 फरकाने निसटता विजय नोंदविला.
Vasco

Vasco

Dainik Gomantak 

पणजी : गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल (Goa Professional League) स्पर्धेत मंगळवारी वास्को स्पोर्टस क्लबने साळगावकर एफसीला नमविले. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेल्या लढतीत वास्कोच्या संघाने 1-0 फरकाने निसटता विजय नोंदविला.

वास्को क्लबतर्फे स्पर्धात्मक फुटबॉलमध्ये पुनरागमन केलेल्या बीव्हन डिमेलोने पुन्हा एकदा दर्जा सिद्ध केला. त्याने नोंदविलेला गोल निर्णायक ठरला. स्पर्धेतील (Goa Professional League) वैयक्तिक तिसरा गोल नोंदविताना बीव्हनने वास्को क्लबला 12 व्या मिनिटास आघाडी मिळवू दिली. सॅनविल डिकॉस्ताच्या शानदार क्रॉसपासवर आल्वितो डायसने चेंडू हेडने नियंत्रित केला व बीव्हनची दिशा दाखविली. नेटसमोर पहारा नसलेल्या बीव्हनने आयतीच संधी साधली.

<div class="paragraphs"><p>Vasco</p></div>
Goa Professional League: एफसी गोवाचा कळंगुटवर दणदणीत विजय

सामन्याच्या 39 व्या मिनिटास वास्को क्लबचा गोलरक्षक लुईस बार्रेटो जाग्यावर नव्हता, पण डॅरील कॉस्ता याचा फटका गोलपट्टीस आपल्यामुळे साळगावकरला बरोबरी साधता आली नाही. त्यानंतर लुईस बार्रेटोने गोलरक्षणातील अफलातून कसब प्रदर्शित करताना चैतन कोमारपंत याचा पेनल्टी फटका अचूक अंदाज बांधत अडविला, त्यामुळे साळगावकरने बरोबरीची सुवर्णसंधी गमावली. यंदाच्या मोसमात लुईसने तीन वेळा पेनल्टी फटके अडविले आहेत.

रेफरी तेजस दुखापतग्रस्त

सामन्याच्या पूर्वार्धात रेफरी तेजस नागवेकर यांची वास्को क्लबच्या खेळाडूशी टक्कर झाली, त्यामुळे ते जायबंदी झाले. तेजस यांना मैदानाबाहेर न्यावे लागले आणि त्यांची जागा चौथे रेफरी शिवराम यांनी घेतली. त्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com