Goa: चर्चिल ब्रदर्स संघात नवा परदेशी

सिला 29 वर्षांचा असून चर्चिल ब्रदर्सशी करार करण्यापूर्वी तो म्यानमारमधील यांगून युनायटेडतर्फे खेळला होता. त्याने त्या संघाचे 58 सामन्यांत प्रतिनिधित्व करताना 39 गोल नोंदविले आहेत.
गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाने नवा परदेशी खेळाडू करारबद्ध केला आहे.
गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाने नवा परदेशी खेळाडू करारबद्ध केला आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गतमोसमातील आय-लीग फुटबॉल (I-League football) स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाने (Churchill Brothers team from Goa) नवा परदेशी खेळाडू (New foreign players) करारबद्ध केला आहे. गिनी देशाचा आघाडीपटू सेकोऊ सिला आगामी मोसमात दोन वेळच्या आय-लीग (I-League) विजेत्या संघातून खेळेल. (Goa: New foreigner in Churchill Brothers squad)

सिला 29 वर्षांचा असून चर्चिल ब्रदर्सशी करार करण्यापूर्वी तो म्यानमारमधील यांगून युनायटेडतर्फे खेळला होता. त्याने त्या संघाचे 58 सामन्यांत प्रतिनिधित्व करताना 39 गोल नोंदविले. नव्या मोसमासाठी चर्चिल ब्रदर्सने करारबद्ध केलेला सिला हा पहिला परदेशी फुटबॉलपटू आहे.

गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाने नवा परदेशी खेळाडू करारबद्ध केला आहे.
Goa Football Association: गोव्यातील फुटबॉल मोसम यंदाही लांबणीवर?

सिला या करारबद्ध करण्यासाठी संघ गतमोसमात इच्छुक होता, पण तेव्हा शक्य झाले नाही. आता आम्ही सिला याच्याकडून अधिकाधिक गोल करण्याच्या अपेक्षा बाळगून आहोत. आम्ही नव्या मोसमासाठी आशावादी आहोत, असे चर्चिल ब्रदर्सच्या सीईओ वालंका आलेमाव यांनी नमूद केले.

गोव्याच्या संघाने आगामी मोसमासाठी रुमानियन पेत्र गिगियू यांना प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. त्यांनी स्पेनच्या फर्नांडो व्हारेला यांची जागा घेतली आहे. गतमोसमातील चारही परदेशी खेळाडू चर्चिल ब्रदर्स संघात नाहीत. लुका मॅसेन, क्लेविन झुनिगा, बॅझी आर्मांद, हम्झा खैर हे परदेशी चर्चिल ब्रदर्सकडून खेळले होते. आगामी मोसमासाठी मॅसेन याने बंगळूर युनायटेड संघाशी करार केला आहे.

चर्चिल ब्रदर्सने आता पहिला परदेशी फुटबॉलपटू करारबद्ध केला असून बाकी खेळाडू निवडीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाने नवा परदेशी खेळाडू करारबद्ध केला आहे.
I-League: फुटबॉल स्पर्धेतून यंदा बढती रद्द होण्याचे संकेत

ट्रिजॉयला संधी

चर्चिल ब्रदर्स संघाने कुंकळ्ळी येथील विंगर ट्रिजॉय डायस याला तीन वर्षांसाठी संघात कायम राखले आहे. गतमोसमात तो या संघातर्फे गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेत खेळला होता. 21 ट्रिजॉय याने यापूर्वी वयोगट पातळीवर शिर्ली स्पोर्टस क्लब, धेंपो स्पोर्टस क्लब, स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2019 साली मैदानावरील बेशिस्त वर्तनासाठी जीएफएच्या शिस्तपालन समितीने त्याच्यावर एका वर्षाची बंदी लादली होती.कारवाईचा कालखंड संपवून तो आता नव्याने सज्ज झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com