Goa Badminton Association
Goa Badminton AssociationDainik Gomantak

Goa : नावेलीत राष्ट्रीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा

Goa : 19 ते 26 सप्टेंबरपर्यंत चुरस; जागतिक स्पर्धेसाठी निवड चाचणी
Published on

पणजीः जागतिक सीनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणी असलेली अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन स्पर्धा (All India Masters Ranking Badminton Tournament) नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये खेळली जाईल. स्पर्धा 19 ते 26 सप्टेंबर या कालावधीत खेळली जाईल. गोवा बॅडमिंटन संघटना (Goa Badminton Association) भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या (Badminton Association of of India) सहकार्याने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करणार आहे.गोव्यात स्पर्धेच्या सफल आयोजनासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसेच गोवा क्रीडा प्राधिकरणाचे चांगले सहकार्य केले आहे, असे आयोजन समिती सचिव संदीप हेबळे यांनी सांगितले.

Goa Badminton Association
गोवा बॅडमिंटन संघटना बिनविरोध

भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष डॉ. हिमंता बिस्व सर्मा यांनी अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन स्पर्धा गोव्यात 19 ते 26 सप्टेंबर या कालावधीत खेळविण्यास मंजुरी दिली आहे. स्पेनमध्ये 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या बीडब्ल्यूएफ जागतिक सीनियर अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय मास्टर संघासाठी ही निवड चाचणी असेल, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव अजयकुमार सिंघानिया यांनी राज्य संघटनेस पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

दृष्टिक्षेपात स्पर्धा...

- 19 ते 22 सप्टेंबर ः 55+, 60+, 65+, 70+ व 75+ वयोगट

- 23 ते 26 सप्टेंबर ः 35+, 40+, 45+ व 50+ वयोगट

- एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी गटात सामने

- देशभरातील अंदाजे 500 ते 700 बॅडमिंटनपटू, गोव्यातील 70 खेळाडू

Goa Badminton Association
Goa: तनिशाचा बॅडमिंटन दुहेरीत धडाका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com