Goa university Intercollegiate competition : व्हॉलिबॉल स्पर्धेत धारबांदोडा, सेंट झेवियर्सची बाजी

अनुक्रमे धेंपो, पेडणे महाविद्यालयावर अंतिम लढतीत मात
Goa Multifaculty College Team
Goa Multifaculty College TeamDainik Gomantak

Goa university : गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन व्हॉलिबॉल स्पर्धेत पुरुष गटात धारबांदोड्याच्या गोवा मल्टिफॅकल्टी महाविद्यालयाने, तर महिलांत म्हापशाच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाने विजेतेपद मिळविले. स्पर्धेतील अंतिम सामने शुक्रवारी ताळगाव पठार येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झाले. पुरुषांच्या अंतिम लढतीत मल्टिफॅकल्टी महाविद्यालयाने कुजिरा येथील एस. धेंपो महाविद्यालयास नमविले.

Goa Multifaculty College Team
Goa Government: ...तर गोव्यातील खाजगी रुग्णालयांची होणार चौकशी; आरोग्य खात्याचे नवे परिपत्रक

अटीतटीच्या लढतीत धारबांदोड्याच्या संघाने 18-25, 25-15, 25-12, 18-25, 15-8असा विजय संपादन केले. महिला गटात सेंट झेवियर्सने पेडणे सरकारी महाविद्यालयास 20-25, 25-23, 25-20, 25-12असे नमवून विजेतेपद प्राप्त केले.

पुरुष गटातील उपांत्य फेरीत मल्टिफॅकल्टी महाविद्यालयाने मांद्रे महाविद्यालयावर, एस. धेंपो महाविद्यालयाने साखळी सरकारी महाविद्यालयावर मात केली होती. महिलांच्या उपांत्य लढतीत पेडणे महाविद्यालयाने नुवे येथील कार्मेल महाविद्यालयास, तर सेंट झेवियर्सने आसगावच्या ज्ञानप्रसारक मंडळ महाविद्यालयास हरविले. क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे व्हॉलिबॉल प्रशिक्षक रामा धावसकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

St. Xavier's College
St. Xavier's CollegeDainik Gomantak
Goa Multifaculty College Team
Sanjivini Sugar Factory: भाऊसाहेबांचा वारसा नष्ट होऊ देणार नाही; आलेमाव यांचा सरकारला इशारा

विजेत्या संघातील खेळाडू

महिला : सेंट झेवियर्स महाविद्यालय : जिओला डिसोझा, फ्लाव्हिना रॉड्रिग्ज, तनिशा मुरगोड, सुकन्या नाईक, ॲनालिसा डिसोझा, वीणा नाईक, युक्ता महातो, संतोषी नागेकर, रिचा गावडे, रिया साळगावकर, खुशी हरमलकर, मैथिली कवठणकर.

पुरुष : गोवा मल्टिफॅकल्टी महाविद्यालय : अक्षय गावकर, साहिल मालवडे, सत्यम सावंत, प्रयाग सावंत, आशिक गावडे, अभिमन्यू सैनी, जेस्पर फर्नांडिस, संकेत देसाई, प्रिन्स सैनी, सतीश झांगली, नमन गावकर, वेदांत गावकर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com