Goa Ministers : गोव्यातील मंत्री वापरतात या आलिशान गाड्या; मुख्यमंत्र्यांपेक्षा महागडे वाहन वाहतूकमंत्र्यांकडे

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे दोन सरकारी वाहने आहेत; परंतु सर्वाधिक किमतीचे वाहन वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडे आहे.
Goa Ministers Uses These Fancy Cars
Goa Ministers Uses These Fancy CarsDainik Gomantak

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे दोन सरकारी वाहने आहेत; परंतु सर्वाधिक किमतीचे वाहन वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे 36 लाख 35 हजार रुपये किमतीची ‘एमजी ग्लेस्टर’ आहे. त्या खालोखाल मुख्यमंत्र्यांकडे 35 लाख 24 हजार रुपये किमतीची फॉर्च्युनर व 24 लाख 77 हजार रुपयांची ‘इनोव्हा क्रेस्टा’ ही वाहने आहेत.

Goa Ministers Uses These Fancy Cars
Save Mahadayi : राज्यभरात दीप जागोर; ‘सेव्ह म्हादई’ चळवळीच्या आवाहनाला प्रतिसाद

मंत्र्यांकडे असणाऱ्या वाहनांविषयी सरकारने माहिती जारी केली आहे. सर्वांत जास्त किमतीचे वाहन गुदिन्हो यांना 24 मार्च 2021 मध्ये मिळाले. त्यांच्या ‘एमजी ग्लेस्टर या वाहनाची सध्याची किंमत 38 लाख रुपये आहे. मुख्यमंत्र्यांकडे असलेली इनोव्हा क्रेस्टा 2 जुलै 2021 मध्ये, तर फॉर्च्युनर नोव्हेंबर 22 मधील आहे.

वीजमंत्री सुदिन ढवळीकरांकडे 34 लाख 50 हजारांची फॉर्च्युनर आहे. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याकडे जीप मेरिडियान हे 32 लाख 40 हजार रुपये किमतीचे वाहन आहे. मच्छिमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्याकडे किया कार्निवल (30 लाख 99 हजार रुपये); कृषिमंत्री रवी नाईक यांच्याकडे 26,72,500 रुपये किमतीची इनोव्हा क्रेस्टा आली. त्यापूर्वी 16 जून 2022मध्ये ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांना 26,66,500 रुपये किमतीची इनोव्हा क्रेस्टा देण्‍यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com