Senior Veteran National Badminton Championship
Senior Veteran National Badminton ChampionshipDainik Gomantak

Senior Veteran National Badminton Championship : गोव्याच्या मंजूला दुहेरीत सुवर्ण

सतीश रौप्यपदकाचा मानकरी
Published on

गोव्याच्या मंजू खांडेपारकर हिने 45व्या इंडियन मास्टर्स (व्हेटरन) राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुनिता स्वामिनाथन हिच्या साथीत महिलांच्या 60+ वयोगटातील दुहेरीत सुवर्णपदक जिंकले.

नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये स्पर्धा झाली. रविवारी अंतिम लढतीत मंजू व सुनिता जोडीने अलका बात्रा व रितू लोहिया जोडीवर 21-15, 21-15अशी मात केली. गोव्याच्या डॉ. सतीश कुडचडकर याला मात्र रौप्य व ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

Senior Veteran National Badminton Championship
Vijay Sardesai : सावंत सरकार हे इव्हेंट मॅनेजर सरकार बनले आहे : विजय सरदेसाई

75+ वयोगटातील मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत सतीश व गौरम्मा वीरलिंगा जोडीवर विद्याभूषण अरोरा व मिनोती आनंद जोडीने 21-15, 21-9 असा विजय नोंदविला. पुरुष एकेरीतील 75+ वयोगटातील एकेरीत एम. डी. मुरली याच्याकडून उपांत्य लढतीत 26-24, 21-19 अशी हार पत्करल्यामुळे सतीशला ब्राँझपदक मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com