Goa: माकाझान फुटबॉल प्रकल्प रेंगाळला

Goa: निधीअभावी पायाभरणी करण्यात आलेल्या मैदान बांधकामास सुरवातच नाही
Goa Football
Goa FootballDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टीः माकाझान (Macazana) क्षेत्रात सर्व सुविधायुक्त फुटबॉल मैदान (Football Ground) उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु, निधीअभावी पायाभरणी करण्यात आलेल्या मैदान बांधकामास सुरवातच झाली नाही. गोवा सरकारने (Goa Government) रखडलेल्या फुटबॉल मैदानाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी माकाझान पंचायतीचे सरपंच आग्नेलो कॉस्ता (Agnelo Costa) यांनी केली आहे.गोवा क्रीडा प्राधिकरणामार्फत बांधण्यात येणाऱ्या या मैदान प्रकल्पात सुमारे १ कोटी ३० लाख रुपये खर्च करुन प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड, फुटबॉलपटूना कपडे बदलण्याची खोली, शौचालय व इतर सुविधांचा समावेश आहे. पण, निधी उपलब्ध नसल्यामुळे मैदानाचे काम रखडले आहे. हे मैदान उभारण्यासाठी अनेक वर्षापासून चर्चा होत आहे, मात्र कोणत्याही प्रकारची कृती झालेली नाही, असे कॉस्ता यांनी सांगितले.

Goa Football
Goa Football: सॅनसन परेरा एफसी गोवासाठी महत्त्वाचा खेळाडू

माकाझान पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मैदानाच्या बांधकामावरून संबंधितांना धारेवर धरले आहे. यासंंबंधी स्थानिक आमदारांशी चर्चा करण्यात आली. सरकारकडे मैदान उभारण्यासाठी निधी नसल्यामुळे बांधकाम सुरू करणे शक्य नसल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली आहे, असे कॉस्ता यांनी सांगितले. फुटबॉल मैदानाच्या जागेवर क्रीडा प्राधिकरणाद्वारे हिरवळ घालण्यात आली होती. परंतु, देखभाल न केल्यामुळे हिरवळ खराब झाले आहे. मैदानावर जाण्यासाठी रस्ता नाही, तसेच जवळील गटारेही अनेक वर्षांपासून उपसण्यात आलेली नाहीत, त्यामुळे पावसाळ्यात मैदानाच्या जागी पाणी तुंबते, अशी माहिती कॉस्ता यांनी दिली.

Goa Football
Goa Football: गोव्याचे तेजस देशातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल रेफरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com