India Australia World Cup: टीम इंडिया.. विजयी भव!

India Australia World Cup आज महामुकाबला : विश्वविजेतेपदासाठी कागारूंशी झुंज; ‘रोहित सेने’वर सदिच्छांचा वर्षाव
India Australia World Cup
India Australia World Cup
Published on
Updated on

India Australia World Cup

शैलेश नागवेकर

जवळपास.... दिवसांपासून सुरू असलेला क्रिकेट विश्वकरंडकाचा रणसंग्राम अखेरच्या टप्प्यात पोचला असून १० पैकी १० सामन्यांत विजय मिळविणारा भारतीय संघ कांगारूंविरुद्धचे अंतिम युद्ध जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या दिमाखदार आणि शानदार लढतीकडे कोट्यवधी भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे. एक लाख तीस हजार भारतीय टीम रोहितला विजय भव..! अशा शुभेच्छा देण्यासाठी आज (ता.१९) रोजी स्टेडियममध्ये उपस्थित असतील.

एक तप वाट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा ‘इंडिया फिनिशेस ऑफ इन स्टाईल’ हा जयघोष ऐकण्यासाठी सर्वांचे कान आतुर झाले आहेत. रोहित सेनेसमोर तेवढ्याच तुल्यबळ ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान आहे.

इतिहास जरी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने असला तरी उत्तम आणि सातत्यपूर्ण कामगिरी अशी अमोघ शस्त्रे भारताच्या भात्यात आहे. याच बळावर भारत मोहीम फत्ते करून आणि तिसऱ्या विजेतेपदाचे स्वप्न साकार करेल, असा विश्वास क्रीडारसिकांकडून व्यक्त होतो आहे.

ऑस्ट्रेलियाने किल्ला लढविला तर जास्तीत जास्त १०० षटके भारतीयांना सर्वोत्तम खेळ करावा लागेल. याच ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत करून भारतीयांनी विश्वकरंडक स्पर्धेची आपली मोहीम सुरु केली होती.

त्यानंतर गगन भरारी घेत सलग ११ विजय मिळविले होते. पहिल्या दोन सामन्यांतील पराभवामुळे दहाव्या स्थानावर घसरण झालेला ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

भारताचे योद्धे सज्ज

रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाने २००३ च्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात सुरवातीलाच सौरव गांगुलीच्या भारतीय संघाचे खच्चीकरण केले होते.

आता उद्या हा डाव उलटविण्याची जबाबदारी स्वतः रोहित शर्मा घेणार असून त्याच्या साथीला कोहलीने आपले रूप विराट केले आहे.

श्रेयस पुन्हा यशस्वी ठरला...बुमराचा मारा बुम..बुम ठरला आणि मोहम्मद शमीचा तोफखाना धडाडला तर अख्खा देश जल्लोषात न्हाऊन निघेल यात शंका नाही.

सट्टाबाजार तेजीत

सट्टाबाजारातही भारत आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यात ‘काँटे की टक्‍कर’ पाहायला मिळत आहे. दोन्‍ही संघांसाठी दर समान असल्‍याने कुठल्‍या संघावर डाव लावावा? असा पेच सटोरींपुढे निर्माण झाला आहे.

भारतात सट्टा बाजार अधिकृत नसला तरी छुप्‍या पद्धतीने कोट्यवधींचा जुगार खेळला जातो. भारत विरुद्ध ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यातील सामन्याकरिता एजंट्‌सकडे दरांची चौकशी केली जाते आहे. या दोन्‍ही संघांचे दर सारखेच आहेत.

सोन्‍याचे करंडक

देशभरात क्रिकेट फिव्हर शिगेला पोचला असताना नाशिकच्‍या संजय रणधीर यांनी चक्‍क सोन्‍याचे चमचमते विश्वकरंडक साकारले आहेत. त्यांचे आकारमान ०.०८ मिलिमीटर आणि १.७ सेंटीमीटर असे आहे. भारतीय संघ विजेता ठरल्‍यास हे दोन्ही करंडक भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज विराट कोहली यांना भेट म्हणून देण्याचा त्यांचा विचार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com