Charity Cup: विजयासह धेंपो क्लबची मोसमाला सुरवात; स्पोर्टिंग क्लब द गोवा संघावर तीन गोलने सहज मात

नव्या मोसमातील पहिला सामना रविवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.
Charity Cup winners Dempo Sports Club
Charity Cup winners Dempo Sports ClubDainik Gomantak
Published on
Updated on

Charity Cup Win Dempo Sports Club: धेंपो स्पोर्टस क्लबने गोव्यातील 2023-24 मधील फुटबॉल मोसमाची सुरवात दणकेबाज विजयासह केली. रविवारी त्यांनी गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) मदतनिधी फुटबॉल लढतीत स्पोर्टिंग क्लब द गोवा संघावर 3-0 फरकाने मात केली.

नव्या मोसमातील पहिला सामना रविवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. धेंपो क्लबच्या विजयात ॲरोन बार्रेटो, साईश बागकर व प्रतीक नाईक यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.

Charity Cup winners Dempo Sports Club
All Goa Rapid Competition: साईरुद्र नागवेकर बुद्धिबळात विजेता; रुबेन कुलासो उपविजेता, ऋषिकेश परब तिसरा

गतमोसमातील गोवा प्रोफेशनल लीग विजेता धेंपो क्लब व उपविजेता स्पोर्टिंग क्लब यांच्यातील सामन्याने गोवा फुटबॉल असोसिएशनने नव्या मोसमाला सुरवात केली.

धेंपो क्लबतर्फे पहिलाच सामना खेळणाऱ्या ॲरोन याने ४० यार्डावरून मारलेल्या सणसणीत फटक्यावर गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली.

त्यानंतर स्पोर्टिंगचा गोलरक्षक भास्कर जल्मी याच्या दक्षतेमुळे धेंपो क्लबच्या लक्ष्मणराव राणे याचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही.

नंतर पी. के. फासीन याच्या शानदार असिस्टवर साईश याने धेंपो क्लबची आघाडी विश्रांतीपूर्वी २-० अशी भक्कम केली.

७३व्या मिनिटास आर्नोल्ड ऑलिव्हेरा याच्या प्रेक्षणीय कॉर्नर किक फटक्यावर प्रतीक याचे हेडिंग भेदक ठरल्यामुळे धेंपो क्लबला तीन गोलची आघाडी मिळविता आली.

Charity Cup winners Dempo Sports Club
Pondicherry T20 : गोव्याचा संघ पुन्हा अडखळला; घरसगुंडीनंतरही विदर्भाचा तीन विकेटने विजय

मदतनिधीचे तिघे जण मानकरी

डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते मदतनिधीचे वितरण झाले. मदतनिधी योजनेचे तिघे जण मानकरी ठरले.

यामध्ये रेफरी कालिदास देसाई, स्वर्गीय ज्यो कुलासो (कुटुंबीयानी निधी स्वीकारला), महिला फुटबॉलपटू रितिन्हा परेरा यांना धनादेश देण्यात आला.

यावेळी जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस, तसेच संघटनेचे कार्यकारी समिती पदाधिकारी उपस्थित होते.

सामन्यातील वैयक्तिक बक्षीस विजेते

  1. सामन्याचा मानकरी : ॲरोन परेरा (धेंपो क्लब)

  2. उत्कृष्ट बचावपटू : ज्योएल डिसोझा (स्पोर्टिंग क्लब)

  3. उदयोन्मुख खेळाडू : प्रतीक नाईक (धेंपो क्लब)

  4. उत्कृष्ट मध्यरक्षक : विनय हरजी (धेंपो क्लब)

  5. उत्कृष्ट गोलरक्षक : डायलन डिसिल्वा (धेंपो क्लब)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com