खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गोव्याला पदकांची अपेक्षा

हरियानात होणाऱ्या स्पर्धेसाठी 11 क्रीडाप्रकारात गोव्याचे 63 खेळाडू
Khelo India Youth Games
Khelo India Youth Games Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : हरियानातील पंचकुला येथे 4 ते 13 जून या कालावधीत होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गोव्याला पदकांची अपेक्षा आहे. स्पर्धेत गोव्याचे एकूण 63 खेळाडू 11 क्रीडाप्रकारांत भाग घेतील. (Goa expects medals in Khelo India Youth Games)

Khelo India Youth Games
कर्णधार बदलला, नशीब नाही… मोठ्या खेळाडूंनीही धावा केल्या, मग RCB कुठे हरला?

गोव्याचे खेळाडू तिरंदाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, ज्युडो, नेमबाजी, जलतरण, मल्लखांब, योग, जिम्नॅस्टिक्स, वेटलिफ्टिंग, फुटबॉल या खेळांत सहभागी होतील. गोव्याच्या खेळाडूंसमवेत 19 अधिकारीही असतील.

क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात गोव्याच्या पथकाला शुभेच्छा दिल्या आहे. त्यांच्या हस्ते खेळाडूंना स्पर्धेसाठी खेळण्याचे साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी क्रीडा संचालक-गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे, दीपेश प्रियोळकर, शंकर गावकर, महेश रिवणकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहाय्यक संचालक (प्रकल्प) मोनिका लोबो ई दोरादो या खेलो इंडिया गोवा विभागीय नोडल अधिकारी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com