Ranji Trophy: गोवेकरांचा पराक्रम, मुंबईकरांनी टेकले गुडघे

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रणजी करंडक (Ranji Trophy) क्रिकेट सामन्यात अफलातून मारा केला.
Ranji Trophy
Ranji TrophyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रणजी करंडक (Ranji Trophy) क्रिकेट सामन्यात अफलातून मारा केला, त्यामुळे ४१ वेळच्या विजेत्या बलाढ्य मुंबई (Mumbai) ला अवघ्या १६३ धावांत गुंडाळण्याचा पराक्रम गोव्याने (Goa) साधला. (Goa defeats Mumbai in Ranji Trophy)

लक्षने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला शून्यावर बाद करण्याची किमया साधली. त्याने ४६ धावांत ६ गडी बाद केले. रणजी कारकिर्दीत त्याने तिसऱ्यांदा डावात पाच गडी बाद केले. लक्षयला सुरेख साथ देताना ऑफस्पिनर अमितने ४७ धावांत ४ गडी टिपले. नंतर गोव्याने पहिल्या डावात दमदार फलंदाजी केली. सलामीचा अमोघ देसाई (५१) याच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर गोव्याने एलिट ड गट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर २ बाद ११४ धावा केल्या. ते अजून ४९ धावांनी मागे असून आठ विकेट्स बाकी आहेत. गोव्याच्या डावात सुयश प्रभुदेसाईनेही आक्रमक ४० धावा केल्या. अमोघ-सुयश जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. दिवसअखेर कर्णधार स्नेहल कवठणकर १६ धावा करून अमोघला साथ देत होता.

Ranji Trophy
Ranji Trophy 2022: 'या' 22 वर्षीय खेळाडूने पदार्पणाच्या सामन्यातच रचला इतिहास

मुंबईची स्थिती बिकट

अनुभव आणि ताकद यांची तुलना करता, मुंबईचा संघ गोव्यावर पूर्ण वर्चस्व राखण्याचे संकेत होते, पण गुरुवारी तसे झाले नाही. २६ वर्षीय लक्षयने भन्नाट मारा करताना दहाव्या षटकातच मुंबईची ३ बाद ३० अशी बिकट अवस्था केली. त्याने पृथ्वी शॉ (९) याला दर्शन मिसाळकरवी झेलबाद केले. नंतर आकर्षित गोमेल (२१) याला यष्टिरक्षक एकनाथ केरकर याच्या हाती झेल देण्यात भाग पाडले, तर फक्त तीन चेंडू टिकलेल्या रहाणेला पायचीत बाद केले. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातून वगळलेल्या रहाणेसाठी शून्यावर बाद होणे धक्कादायक ठरले. एकंदरीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मुंबईच्या अंगलट आला.

Ranji Trophy
Ranji Trophy 2022: गोव्याची सलामी ओडिशाशी

सर्फराजची झुंज अपयशी

सौराष्ट्रविरुद्ध मागील लढतीत २७५ धावा केलेल्या सर्फराज खान याने अर्धशतक नोंदवत मुंबईला सावरण्याचा प्रयत्न केला. सर्फराजने सचिन यादवसह चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली. उपाहारानंतर अमित यादवने सचिनला पायचीत केल्यानंतर मुंबईची पुन्हा घसरगुंडी उडाली. सर्फराजला (६३) लक्षयने यष्टिरक्षक केरकर याच्याकरवी झेलबाद केल्यामुळे मुंबईची ७ बाद १२३ अशी स्थिती झाली. पुढच्याच चेंडूवर लक्षयने धवल कुलकर्णीला बाद करून केल्यामुळे माजी विजेते आणखीनच संकटात सापडले. तनुष कोटियन (३०) व मोहित अवस्थी (नाबाद १२) यांनी नवव्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केल्यामुळे मुंबईला दीडशे धावांचा टप्पा गाठता आला.

संक्षिप्त धावफलक

मुंबई, पहिला डाव ः ५२.४ षटकांत सर्वबाद १६३ (आकर्षित गोमेल २१, सचिन यादव २७, सर्फराज खान ६३- ११० चेंडू, ९ चौकार, तनुष कोटियन ३०, मोहित अवस्थी नाबाद १२, श्रीकांत वाघ ८-२-२७-०, लक्षय गर्ग १४.४-३-४६-६, अमित यादव १७.४-६-४७-४, दर्शन मिसाळ ४.२-०-२३-०, शुभम रांजणे ५-२-८-०, अमूल्य पांड्रेकर ३-०-१२-०).

गोवा, पहिला डाव ः ३३ षटकांत २ बाद ११४ (अमोघ देसाई नाबाद ५१- १०६ चेंडू, ७ चौकार, सुमीरन आमोणकर ६, सुयश प्रभुदेसाई ४०- ४५ चेंडू, ७ चौकार, स्नेहल कवठणकर नाबाद १६, धवल कुलकर्णी १-२८, मोहित अवस्थी १-१४).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com