Goa Chess: एथनची अंतिम फेरीत धडक

Goa Chess: विश्वकरंडक (कॅडेट्स व युवा) स्पर्धेतील पदक निश्चित
Goa Chess: Ethan Vaz
Goa Chess: Ethan VazDainik Gomantak
Published on
Updated on

पणजीः गोव्याचा बुद्धिबळपटू (Goa Chess Player) एथन वाझ (Ethan Vaz) याचे विश्वकरंडक (कॅडेट्स व युवा) बुद्धिबळ (World Cup Cadets and Youth Chess) स्पर्धेतील पदक निश्चित झाले आहे. रविवारी त्याने 10 वर्षांखालील वयोगटात अंतिम फेरीत धडक मारली. बाद फेरी पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या उपांत्य लढतीत एथनने रशियाच्या मॅटफे युरासोव याच्यावर मात केली. अंतिम लढत सोमवारी होईल. सुवर्णपदकासाठी एथन तुर्कस्तानाचा अव्वल मानांकित खेळाडू एर्दोगमूस यागिझ-कान याला आव्हान देईल.

Goa Chess: Ethan Vaz
Goa Chess : एथनचा उपांत्य फेरीत प्रवेश

उपांत्य लढतीतील पहिल्या रॅपिड डावात एथनने रशियन खेळाडूच्या आव्हानास सहजपणे तोंड देत विजयी सुरवात केली, मात्र दुसऱ्या डावात त्याला अनपेक्षित हार पत्करावी लागली. तिसऱ्या डावात मॅटफे याने नाणेफेक जिंकून पांढऱ्या मोहऱ्यासह खेळण्याचे ठरविले. हा डाव उत्कंठावर्धक ठरला. डावाच्या अंतिम टप्प्यात एथनच्या घड्याळ्यात पाच सेकंद बाकी असताना प्रतिस्पर्ध्यापाशी 18 सेकंद बाकी होते. सुरवातीस विजयी स्थितीत असलेल्या गोमंतकीय खेळाडूच्या पराभवाची शक्यता होती. मात्र एथनने कमाल करत बाजी पलटवली. तीन सेकंद बाकी ठेवून त्याने रशियन खेळाडूचा पाडाव केला.

Goa Chess: Ethan Vaz
Goa Chess: विश्वकरंडक बुद्धिबळात एथनची दुहेरी चमक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com