Santosh Trophy: फाहीज, ट्रिजॉय यांचे निर्णायक गोल, गोव्याची अरुणाचलवर मात

स्पर्धेतील दुसऱ्या पराभवामुळे अरुणाचल प्रदेशचे तीन सामन्यानंतर तीन गुण कायम राहिले.
Santosh Trophy
Santosh TrophyDainik Gomantak

Santosh Trophy: संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्या गोव्याने (Goa) आव्हान कायम राखताना गट तीनमध्ये रविवारी शानदार विजय नोंदविला. त्यांनी अरुणाचल प्रदेशचे (Arunachal Pradesh) आव्हान 2-1 फरकाने परतावून लावले.

(Goa beat Arunachal Pradesh 2-1 in Santosh Trophy)

Santosh Trophy
CK Naidu Cricket Tournament: शतकवीर मंथनने गोव्याला सावरले, चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

सामना आसाममधील कोक्राझार येथे झाला. सामन्याच्या 19व्या मिनिटास महंमद फाहीज याने गोव्याचा पहिला गोल केला, नंतर सलग दुसऱ्या लढतीत गोल करताना ट्रिजॉय डायसने गोव्याची आघाडी 28व्या मिनिटासा वाढविली. अरुणाचल प्रदेशचा बदली खेळाडू ताबा हेली याने 47व्या मिनिटास याने संघाची पिछाडी एका गोलने कमी करणारा गोल केला.

गोव्याचा हा तीन लढतीतील दुसरा विजय ठरला. त्यांची अन्य एक लढत बरोबरीत राहिली आहे. गोव्याचे आता सात गुण झाले आहेत. स्पर्धेतील दुसऱ्या पराभवामुळे अरुणाचल प्रदेशचे तीन सामन्यानंतर तीन गुण कायम राहिले.

Santosh Trophy
New Zuari Bridge: नवे वर्ष, नवा पूल अन् पहिला अपघात, झुआरीवर कार धडकली

सुरवातीचे काही प्रयत्न असफल ठरल्यानंतर फाहीजने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. प्रतिस्पर्धी बचावपटू याचांग कानी याच्याकडून चेंडू हिसकावून घेत फाहीजने गोलरक्षक जागोम लोयी जागा सोडून पुढे आल्याची संधा साधली. नऊ मिनिटांनंतर लिस्टनच्या लाँग बॉलवर ट्रिजॉयने चेंडू व्यवस्थित नियंत्रित केला आणि नंतर अरुणाचलच्या गोलरक्षकाला गुंगारा देण्याचे काम चोखपणे बजावले. उत्तरार्धाचा खेळ सुरू झाल्यानंतर अरुणाचलने लगेच गोल केला. लोया याच्या फ्रीकिक फटक्यावर गोव्याचा गोलरक्षक हॅन्सेल कुएल्हो चेंडू व्यवस्थित अडवू शकला नाही. त्याचा फायदा उठवत ताबा हेली याने आरामात चेंडूला गोलनेटची अचूक दिशा दाखविली. पिछाडी एका गोलने कमी केल्यानंतर अरुणाचलने बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com