Goa: बॅडमिंटनपटू तनिशाची चाचणीसाठी निवड

Goa: हैदराबाद येथील पुल्लेला गोपिचंद अकादमीत चाचणी प्रक्रिया
Goa Badminton Player Tanisha Crasto
Goa Badminton Player Tanisha CrastoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी ः गोव्याची (Goa) युवा गुणवान बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टो (Tanisha Crasto) हिला भारतीय बॅडमिंटन संघ निवड चाचणीसाठी (India Badminton Team Selection) पाचारण करण्यात आले आहे. आगामी थॉमस आणि उबेर कप, तसेच सुदिरमन कप बॅडमिंटन स्पर्धेसाठी ही चाचणी असेल. हैदराबाद येथील पुल्लेला गोपिचंद अकादमीत भारतीय बॅडमिंटन संघटनेची निवड चाचणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली.

Goa Badminton Player Tanisha Crasto
Olympics Awareness Programme: मिरामारला रंगला बॅडमिंटन महोत्सव

देशातील उदयोन्मुख बॅडमिंटन खेळाडूंत तनिशाची गणना होते. ती राष्ट्रीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेतील सध्याची मिश्र दुहेरीतील विजेती आहे. टॉप्स ऑलिंपिक योजनेस समावेश असलेली तनिशा एकमेव गोमंतकीय क्रीडापटू आहे. भारतीय संघ निवड चाचणी तनिशा मिश्र दुहेरी, तसेच महिला दुहेरीतील जागेसाठी दावेदार असेल. तनिशा हिने ज्युनियर गटात मुलींच्या दुहेरीत, तसेच मिश्र दुहेरीत राष्ट्रीय पातळीवरील विविध मानांकन स्पर्धांत यश मिळविले आहे. आशियाई व जागतिक ज्युनियर स्पर्धेत तनिशाने भारताच्या बॅडमिंटन संघात स्थान मिळविले होते.

Goa Badminton Player Tanisha Crasto
गोवा बॅडमिंटन संघटना बिनविरोध

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com