Goa: सालसेत तालुका बुद्धिबळ असो.च्या अध्यक्षपदी आशेश केणी विजयी

आशेश केणी यांना 32 तर त्याचे प्रतिस्पर्धी दिगंबर सावळ याना 23 मते पडली. सचिवपदी निवड झालेल्या सुनिल बाळ्ळीकर यास 31 तर त्याचे प्रतिस्पर्धी निलेश शिरो़डकर याला 24 मते पडली.
सालसेत तालुका बुद्धिबळ असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशेश केणी यांची तर सचिवपदी सुनील बाळ्ळीकर यांची निवड झाली.
सालसेत तालुका बुद्धिबळ असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशेश केणी यांची तर सचिवपदी सुनील बाळ्ळीकर यांची निवड झाली.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

फातोर्डा : सालसेत (Salset) तालुका बुद्धिबळ असोसिएशनची (Chess Association) नुतन कार्यकारिणी निवडण्यासाठी आज मडगावच्या बीपीएस क्लब सभागृहात निवडणुक पार पडली. या निवडणुकीत असोसिएशनच्या 56 पैकी 55 सभासदांनी भाग घेतला. आशेश केणी (Ashesh Keni) यांची अध्यक्षपदी (president) तर सुनील बाळ्ळीकर याची सचिवपदी निवड झाली.

आशेश केणी यांना 32 तर त्याचे प्रतिस्पर्धी दिगंबर सावळ याना 23 मते पडली. सचिवपदी निवड झालेल्या सुनिल बाळ्ळीकर यास 31 तर त्याचे प्रतिस्पर्धी निलेश शिरो़डकर याला 24 मते पडली.

सालसेत तालुका बुद्धिबळ असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशेश केणी यांची तर सचिवपदी सुनील बाळ्ळीकर यांची निवड झाली.
गोव्या जगातील सर्वात सुरक्षित पर्यटन स्थळांपैकी एक बनवण्यावर लक्ष केंद्रित करणार

उपाध्यक्षपदी दामोदर जांबावलीकर याची निवड झाली. त्याला 35 तर प्रतिस्पर्धी नविता ए. च्यारी हिला 10 मते पडली. संयुक्त सचिवपदी निवड झालेल्या पृथ्विराज कातकार याला 40 मते पडली तर प्रतिस्पर्धी ्परेश पांडुरंग नाटेकर यास 15 मते पडली.

कार्यकारी समिती सदस्यपदी डॊ. शैलजा देसाई ई परब (38), अरुण कुमार बी आर शेट्टी (43), ज्योत्सना सारिपल्ली (29) व प्रकाश पुंडलीक इंसुलकर(28) यांची निवड झाली.

डॉ एडगर कायतानो मिनेझीस, पांडुरंग मोहन नायक व प्रज्योती उदय नाईक देसाई यांची निवड होऊ शकली नाही. निवडणुकीच्या निर्वाचन अधिकारी म्हणून अॅड. गीता कंटक यांनी काम पाहिले तर शरेंद्र नाईक यानी तिला सहकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com