FIFA U17 World Cup: युवा जर्मनी टीम जगज्जेती! पेनल्टी शुटआऊटमध्ये फ्रान्सवर मात

U17 Germany vs U17 France: जर्मनी संघाने फ्रान्सला फायनलमध्ये पराभूत करत १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकपवर नाव कोरले आहे.
FIFA U17 World Cup 2024 | Germany
FIFA U17 World Cup 2024 | Germany X/ FIFAWorldCup
Published on
Updated on

Germany won FIFA Under-17 World Cup 2023:

इंडोनेशियामध्ये झालेल्या 17 वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद जर्मनीने पटकावले. शनिवारी (२ डिसेंबर) पार पडलेल्या अंतिम सामन्यात युवा जर्मनी संघाने फ्रान्सला अंतिम सामन्यात पेनल्टी शुटआऊटमध्ये मात देत विश्वविजेतेपद पटकावले.

त्यामुळे आता जर्मनीने एकाच वर्षात एकाच वयोगटातील जागतिक आणि युरोपियन विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम केला आहे.

अंतिम सामन्यात अतिरिक्त वेळेनंतरही 2-2 अशी बरोबरी झाली होती. त्यानंतर युवा जर्मनीने पेनल्टी शुटआऊटमध्ये फ्रान्सला 4-3 असा पराभवाचा धक्का देत पहिल्यांदाच 17 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला.

जर्मनीच्या विजयात गोलकिपर कोनस्टाटीन हिडने महत्वाची भूमिका बजावली. त्याने पेनल्टी शुटआऊटवेळी दोन गोल रोखत मोलाचा वाटा उचलला.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर जर्मनीने आधीच आघाडी घेतली होती. जर्मनीकडून फॉर्डवर्डच्या पॅरिस ब्रुनरने 28 व्या मिनिटालाच पहिला गोल नोंदवला होता. त्यामुळे पहिला हाफ संपला तेव्हा जर्मनीकडे 1-0 अशी आघाडी होती.

दुसऱ्या हाफमध्येही जर्मनीने चांगली सुरुवात केली. कर्णधार नोह जार्वितने 50 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवत आघाडी वाढवली. पण पुढच्या तीन मिनिटातच सायमन बौब्रे शानदार गोल नोंदवत फ्रान्सला सामन्यात परत आणले.

यानंतर 69 व्या मिनिटाच्या दरम्यान एक नाट्यमय घटना घडली. आधीच यलो कार्ड मिळालेल्या जर्मनीचा मिडफिल्डर विनर्स ओसावेला इस्माईल बौनेबवर पडल्याप्रकरणी रेड कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे जर्मनीला 10 खेळाडूंसह खेळावे लागले.

दरम्यान, नंतर फ्रान्सनेही जर्मनीवरील दबाव वाढवला. 85 व्या मिनिटाला मॅथिस अमोगोने फ्रान्ससाठी दुसरा गोल नोंदवत बरोबरी साधली. ही बरोबरी सामन्यातील निर्धारित वेळ संपेपर्यंत कायम राहिली.

अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघाना गोल करता आला नाही. त्यामुळे पेनल्टी शुटआऊटमध्ये निकाल लावण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com