GCA Premier League : सप्ततारांकित’ अमूल्यसमोर ‘साळगावकर’ची शरणागती

जीनो क्लबचे वर्चस्व : धेंपो क्लबविरुद्ध करिमाबादच्या दीपराजचे तुफानी शतक
GCA Premier League Cricket Tournament Latest Updates
GCA Premier League Cricket Tournament Latest UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : ‘सप्ततारांकित’ अमूल्य पांड्रेकरच्या भेदक फिरकीसमोर साळगावकर क्रिकेट क्लबने सपशेल शरणागती पत्करली, त्यामुळे जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीत जीनो स्पोर्टस क्लबला शुक्रवारी पहिल्याच दिवशी वर्चस्व प्रस्थापित करता आले. आणखी एका सामन्यात धेंपो क्रिकेट क्लबविरुद्ध करिमाबादच्या दीपराज गावकरने तुफानी शतक झळकाविले.

GCA Premier League Cricket Tournament Latest Updates
लखनौला फक्त 2 गुण हवे आहेत, KKR कसा करेल सामना?

सांगे येथील जीसीए मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना साळगावकर संघ चांगल्या सुरवातीनंतर ढेपाळला. बिनबाद 48 वरून त्यांचा पहिला डाव 155 धावांत संपुष्टात आला. डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्यने सात फलंदाज अवघ्या 37 धावांत टिपले. त्याला साथ देताना ऑफस्पिनर मोहित रेडकरने तीन गडी बाद केले. दिवसअखेर जीनो क्लबने बिनबाद 60 धावा करून आघाडीच्या दिशेने कूच केली.

दीपराजच्या झंझावाती 178 धावा

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर दीपराज गावकर धेंपो क्लबच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने 151 चेंडूंत आक्रमक 178 धावा केल्या. यादरम्यान त्याने 24 चौकार व तीन षटकार मारले. दीपराजने तुनीष सावकार (88) याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी 241धावांची भागीदारी केली. तुनीषने 133 चेंडूंतील खेळीत आठ चौकार व पाच षटकार मारले.

संक्षिप्त धावफलक

साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव : 65.1 षटकांत सर्वबाद 155 (सुमीरन आमोणकर 58, ईशान गडेकर 33, किथ वाझ 38, मोहित रेडकर 3-47, अमूल्य पांड्रेकर 23.1-5-37-7) विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव : 22 षटकांत बिनबाद 60 (आर्यन नाबाद 23, शिवम आमोणकर नाबाद 32).

करिमाबाद क्रिकेट क्लब, पहिला डाव : 74.3 षटकांत सर्वबाद 365 (अझान थोटा 31, आलम खान 10, तुनीष सावकार 88, दीपराज गावकर 178, राजशेखर हरिकांत 24, लकमेश पावणे 11, हर्षद गडेकर 1-49, जगदीश पाटील 1-62, फरदीन खान 2-51, विकास सिंग 3-113, उदित यादव 2-47) विरुद्ध धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव : 7 षटकांत 1 बाद 24 (करण वशोदिया नाबाद 14, लकमेश पावणे 1-13).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com