Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट नियामक आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ यांच्यातील मतभेद अद्यापही सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले होते की भारतीय संघ आशिया चषक 2023 स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. तेव्हापासून हे मदभेद अधिक प्रखर झाले.
त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (PCB) अध्यक्ष रमीज राजा यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले होते की जर भारतीय खेळाडू आशिया चषकासाठी पाकिस्तानला येणार नसतील, तर पाकिस्तानी क्रिकेटपटूही पुढीलवर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी भारतात येणार नाही. आता यावर भारताटचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही (Gautam Gambhir) प्रतिक्रिया दिली आहे.
गंभीर म्हणाला की 'हा बीसीसीआय आणि पीसीबीचा निर्णय आहे. ते जो कोणता निर्णय घेतील तो एकत्र मिळून घेतील.'
पुढील वर्षी आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानात होणार होते. मात्र, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी स्पष्ट केले की 2023 ला होणारा आशिया चषक तटस्थ ठिकाणी होईल.
यानंतर रमीज राजा यांनी उर्दू न्यूजशी बोलताना सांगितले, 'जर पाकिस्तानने पुढीलवर्षी भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये सहभाग घेतला नाही, तर सामने कोण पाहाणार आहे. आम्ही स्पष्ट भूमीका घेतली आहे, जर भारतीय संघ इकडे आला, तर आम्ही वर्ल्डकपसाठी भारतात जाऊ. जर ते नाही आले, तर त्यांनी आमच्याशिवाय वर्ल्डकप खेळावा. आम्ही आक्रमक पवित्रा स्विकारला आहे.'
'आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे. मी नेहमीच म्हणत आलो आहे की आपल्याला पाकिस्तान क्रिकेटची अर्थव्यवस्था सुधारावी लागेल आणि ते तेव्हाच होईल, जेव्हा आपण चांगली कामगिरी करत राहू. 2021 टी20 विश्वचषकात आम्ही भारताला पराभूत केले होते, आम्ही आशिया चषक टी20 स्पर्धेतही भारताला पराभूत केले. एका वर्षात पाकिस्तान क्रिकेट संघाने अब्जावधीची अर्थव्यवस्था असलेल्या संघाला दोनदा हरवले.'
गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. हे दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये किंवा आशिया चषकात आमने-सामने येतात. तसेच भारताने शेवटचा पाकिस्तान दौरा 2005-06 च्या हंगामात केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.