FIFA 2022 : फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेचा अंतिम सामना फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात झाला. या सामन्यात अर्जेटिना संघाने पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 अशा फरकाने विजय मिळवत विश्वविजेतेपदावर नाव कोरले. अर्जेंटिनाचा हा एकूण तिसरा वर्ल्डकप आहे.
अर्जेंटिनाकडून मेस्सीने गोलचे खाते उघडले होते. त्याने 23 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. त्यानंतर एंजेल डी मारियाने मॅक अलिस्टरच्या असिस्टवर अर्जेंटिनासाठी दुसरा गोल केला. पण दुसऱ्या हाफमध्ये एमबाप्पेने फ्रान्ससाठी 2 गोल केले. त्यामुळे 2-2 च्या बरोबरीमुळे सामना ज्यादा वेळेत गेला.
ज्यादाच्या वेळेत 3-3 अशी बरोबरी झाल्याने सामना पेनल्टी शुटआऊटपर्यंत गेला आणि त्यात मात्र अर्जेंटिनाने बाजी मारली.
या विजेतेपदासह आता अर्जेंटिना संघ 3 किंवा त्यापेक्षा अधिक वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघांमध्येही सामील झाला आहे. यापूर्वी ब्राझील (5), जर्मनी (4) आणि इटली (4) यांनी असा कारनामा केला आहे.
आजपर्यंतचे फुटबॉल वर्ल्डकप विजेते आणि उपविजेते संघ -
1930 - विजेते - उरुग्वे, उपविजेते - अर्जेंटिना
1934 - विजेते - इटली, उपविजेते -चेकोस्लोव्हाकिया
1938 - विजेते - इटली, उपविजेते - हंगेरी
1950 - विजेते - उरुग्वे, उपविजेते - ब्राझील
1954 - विजेते - वेस्ट जर्मनी, उपविजेते - हंगेरी
1958 - विजेते - ब्राझील, उपविजेते - स्विडन
1962 - विजेते - ब्राझील, उपविजेते - चेकोस्लोव्हाकिया
1966 - विजेते - इंग्लंड, उपविजेते - वेस्ट जर्मनी
1970 - विजेते - ब्राझील उपविजेते - इटली
1974 - विजेते - वेस्ट जर्मनी, उपविजेते - नेदरलँड्स
1978 - विजेते - अर्जेंटिना, उपविजेते - नेदरलँड्स
1082 - विजेते - इटली, उपविजेते - वेस्ट जर्मनी
1986 - विजेते - अर्जेंटिना, उपविजेते - वेस्ट जर्मनी
1990 - विजेते - वेस्ट जर्मनी, उपविजेते - अर्जेंटिना
1994 - विजेते - ब्राझील, उपविजेते - इटली
1998 - विजेते - फ्रान्स, उपविजेते - ब्राझील
2002 - विजेते - ब्राझील, उपविजेते - जर्मनी
2006 - विजेते - इटली, उपविजेते - फ्रान्स
2010 - विजेते - स्पेन, उपविजेते - नेदरलँड्स
2014 - विजेते - जर्मनी, उपविजेते - अर्जेंटिना
2018 - विजेते - फ्रान्स, उपविजेते -क्रोएशिया
2022 - विजेते - अर्जेंटिना, उपविजेते - फ्रान्स
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.