Pranali Kodre
फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.
हा मेस्सीचा पाचवा वर्ल्डकप आहे. त्याच्याशिवाय केवळ अँटोनियो कार्बाजल, लोथर मॅथॉस, राफा मार्केझ, आंद्रेस गार्डाडो आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनीच 5 वर्ल्डकप खेळले आहेत.
मेस्सी जर फ्रान्सविरुद्ध अंतिम सामन्यात खेळला, तर तो वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 26 सामन्यांत खेळणारा खेळाडू ठरेल. सध्या तो या यादीत लोथर मॅथॉससह संयुक्तरित्या 25 सामन्यांसह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे.
मेस्सी पॉल मालदिनी यांच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक मिनिटे खेळण्याच्या विक्रमालाही मागे टाकू शकतोय मालदिनी यांनी 2217 मिनिटे खेळली असून मेस्सीने आत्तापर्यंत 2194 मिनिटे वर्ल्डकपमध्ये खेळली आहेत.
बाद फेरीत सर्वाधिक असिस्ट करण्याच्या यादीत पेले आणि मेस्सी यांच्या नावावर 6 असिस्ट आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात मेस्सी पेले यांना मागे टाकू शकतो.
मेस्सी हा पाच वर्ल्डकपमध्ये असिस्ट करणारा एकमेव खेळाडू देखील आहे.
मेस्सीने आत्तापर्यंत वर्ल्डकपमध्ये 11 गोल केले आहेत. या यादीत त्याच्यापुढे मिरोस्लाव क्लोज (16), रोनाल्डो (ब्राझील) (15), गर्ड मुलर (14), फक्त फॉन्टेन (13) आणि पेले (12) हे खेळाडू आहेत.
मेस्सी हा कर्णधार म्हणून 18 सामने वर्ल्डकपमध्ये खेळला आहे.
इतकंच नाही तर तो त्याच्या किशोर वयात, विशीत आणि तिशीत गोल करणारा एकमेव खेळाडू देखील आहे.